S M L

शेतकर्‍यांच्या 2 हजार कोटी पॅकेजमधून 300 कोटी मंजूर

21 मार्चकापूस, सोयाबिन आणि धान पिकाच्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने 2000 कोटींच पॅकेज जाहीर केलं होतं. पण या पॅकेजमधील 300 कोटीच सरकारने मंजूर केले आहे. आणि बाकीचे सतराशे कोटी येत्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेत अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात दिली. मंजूर केलेले 300 कोटी हे आकस्मिक निधीतून काढण्यात आले आहेत. या पॅकेजमधील 129 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला. आकस्मिक निधीतून 150 कोटी रुपयेच काढण्याचे संकेत असताना सरकारने या निधीतून 377 कोटी 49 लाख रूपये सरकारने काढले आहेत. दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी 2 कोटी आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी 32 कोटीही सरकारने आकस्मिक निधितून काढले आहेत असा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2012 11:24 AM IST

शेतकर्‍यांच्या 2 हजार कोटी पॅकेजमधून 300 कोटी मंजूर

21 मार्च

कापूस, सोयाबिन आणि धान पिकाच्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने 2000 कोटींच पॅकेज जाहीर केलं होतं. पण या पॅकेजमधील 300 कोटीच सरकारने मंजूर केले आहे. आणि बाकीचे सतराशे कोटी येत्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेत अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात दिली. मंजूर केलेले 300 कोटी हे आकस्मिक निधीतून काढण्यात आले आहेत. या पॅकेजमधील 129 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला. आकस्मिक निधीतून 150 कोटी रुपयेच काढण्याचे संकेत असताना सरकारने या निधीतून 377 कोटी 49 लाख रूपये सरकारने काढले आहेत. दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी 2 कोटी आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी 32 कोटीही सरकारने आकस्मिक निधितून काढले आहेत असा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2012 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close