S M L

रिक्षाचालकांच्या संपामुळे नवी मुंबईकरांचे हाल

21 मार्चनवी मुंबईत गेल्या दोन दिवसापासून रिक्षा चालकांनी बंद पुकारला आहे. भाडेकपातीच्या निर्णयाविरुध्द रिक्षा चालकांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत. रिक्षा चालकांच्या या मनमानीमुळे नवी मुंबईकर मात्र हैराण झाले आहे. रिक्षाचालकांचा संप मोडीत काढण्यासाठी आता रिपाइंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी रिपाइं कार्यकर्त्यांनी वाशी रेल्वे स्टेशनवर मोफत गाड्या उपलब्ध करुन दिल्यात. वाशी स्थानकावरुन कौपरखैरणे, तुर्भे, ऐरोली, नेरुळ भागात जाणार्‍या प्रवाशांना रिपाइं कार्यकर्ते आज आपल्या गाडीतून सोडत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2012 12:47 PM IST

रिक्षाचालकांच्या संपामुळे नवी मुंबईकरांचे हाल

21 मार्च

नवी मुंबईत गेल्या दोन दिवसापासून रिक्षा चालकांनी बंद पुकारला आहे. भाडेकपातीच्या निर्णयाविरुध्द रिक्षा चालकांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत. रिक्षा चालकांच्या या मनमानीमुळे नवी मुंबईकर मात्र हैराण झाले आहे. रिक्षाचालकांचा संप मोडीत काढण्यासाठी आता रिपाइंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी रिपाइं कार्यकर्त्यांनी वाशी रेल्वे स्टेशनवर मोफत गाड्या उपलब्ध करुन दिल्यात. वाशी स्थानकावरुन कौपरखैरणे, तुर्भे, ऐरोली, नेरुळ भागात जाणार्‍या प्रवाशांना रिपाइं कार्यकर्ते आज आपल्या गाडीतून सोडत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2012 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close