S M L

रशियामध्ये भगवद्‌गीतेवर बंदीची याचिका फेटाळली

21 मार्चरशियामध्ये भगवद्‌गीतेवर बंदी घालण्याची याचिका रशियन कोर्टाने फेटाळली आहे. इस्कॉनचे संस्थापक प्रभूपाद वेदांत स्वामी यांनी भगवत गीतेचा रशियन भाषेत अनुवाद केला. पण यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका एका संघटनेनं दाखल केली होती. डिसेंबर महिन्यात भगवद्गीता हा ग्रंथ अतिरेकी साहित्य असल्याने त्यावर बंदी घालावी अशी याचिका रशियन कोर्टात दाखल करण्यात आली होती. रशिया सरकारने गीतेवर बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव केला होता. रशियाच्या या भूमिकेमुळे लोकसभेत एकच गदारोळ झाला. विरोधांनी रशियाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी विनंती केली होती. परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी याबद्दल रशियन सरकारला विनंती केली. अखेर रशियाने गीतेबद्दल गैरसमज झाल्यामुळे असा निर्णय चुकीचा होता याची कबुली दिली होती. आज पुन्हा एकदा भगवद्‌गीतेवर बंदी घालण्याची याचिका रशियन कोर्टाने फेटाळून लावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2012 01:12 PM IST

रशियामध्ये भगवद्‌गीतेवर बंदीची याचिका फेटाळली

21 मार्च

रशियामध्ये भगवद्‌गीतेवर बंदी घालण्याची याचिका रशियन कोर्टाने फेटाळली आहे. इस्कॉनचे संस्थापक प्रभूपाद वेदांत स्वामी यांनी भगवत गीतेचा रशियन भाषेत अनुवाद केला. पण यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका एका संघटनेनं दाखल केली होती. डिसेंबर महिन्यात भगवद्गीता हा ग्रंथ अतिरेकी साहित्य असल्याने त्यावर बंदी घालावी अशी याचिका रशियन कोर्टात दाखल करण्यात आली होती. रशिया सरकारने गीतेवर बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव केला होता. रशियाच्या या भूमिकेमुळे लोकसभेत एकच गदारोळ झाला. विरोधांनी रशियाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी विनंती केली होती. परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी याबद्दल रशियन सरकारला विनंती केली. अखेर रशियाने गीतेबद्दल गैरसमज झाल्यामुळे असा निर्णय चुकीचा होता याची कबुली दिली होती. आज पुन्हा एकदा भगवद्‌गीतेवर बंदी घालण्याची याचिका रशियन कोर्टाने फेटाळून लावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2012 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close