S M L

पंडित यादवराज फड यांचा जाहीर सत्कार

22 मार्चपुण्यात अनोख्या स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. किराणा घराण्याचे विख्यात गायक पंडित यादवराज फड यांना त्यांच्या शिष्यांनी गुरूदक्षिणा दिली. किराणा गायकीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना रौप्यकलश आणि 3 लाख रुपयांची रक्कम गुरुदक्षिणा म्हणून देण्यात आली. उस्ताद उस्मान खान आणि पंडित विकास कशाळकर यांच्या हस्ते फड यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. फड यांच्या वारकरी संगीतातल्या योगदानाचंही उस्ताद उस्मान खान यांनी यावेळी कौतुक केले. फड यांच्या विष्णूमय या डीव्हीडी आणि स्वरोत्सव या गौरवांकाचंही प्रकाशन करण्यात आलं. यावेळी पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ, फांऊटन म्युझिकचे कांतिलाल शहा, गौरव समितीचे अध्यक्ष संजय बालवडकर, शांताराम इंगवले, सदानंद बोरसे, सुलभा तेरणीकर उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2012 03:36 PM IST

पंडित यादवराज फड यांचा जाहीर सत्कार

22 मार्च

पुण्यात अनोख्या स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. किराणा घराण्याचे विख्यात गायक पंडित यादवराज फड यांना त्यांच्या शिष्यांनी गुरूदक्षिणा दिली. किराणा गायकीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना रौप्यकलश आणि 3 लाख रुपयांची रक्कम गुरुदक्षिणा म्हणून देण्यात आली. उस्ताद उस्मान खान आणि पंडित विकास कशाळकर यांच्या हस्ते फड यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. फड यांच्या वारकरी संगीतातल्या योगदानाचंही उस्ताद उस्मान खान यांनी यावेळी कौतुक केले. फड यांच्या विष्णूमय या डीव्हीडी आणि स्वरोत्सव या गौरवांकाचंही प्रकाशन करण्यात आलं. यावेळी पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ, फांऊटन म्युझिकचे कांतिलाल शहा, गौरव समितीचे अध्यक्ष संजय बालवडकर, शांताराम इंगवले, सदानंद बोरसे, सुलभा तेरणीकर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2012 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close