S M L

भारत आणि इंग्लंडदरम्यानची चौथी वनडे बंगलोरमध्ये

22 नोव्हेंबर बंगलोरभारत आणि इंग्लंडदरम्यानची चौथी वनडे रविवारी बंगलोरमध्ये रंगणार आहे. या डे-नाईट मॅचमध्ये भारतीय टीमचंच पारडं जड दिसत आहे. तर इंग्लंडसमोर आव्हान आहे ते मॅच जिंकून सीरिजमधलं आपलं आव्हान कायम ठेवण्याचं. धोणीची यंग ब्रिगेड सध्या चांगलीच फॉर्मात आहे. इंग्लंडविरुध्दच्या सात वनडेच्या सीरिजमध्ये भारतानं तीन-शून्य अशी आघाडी घेत आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. आता सीरिजवर कब्जा करण्यासाठी भारताला फक्त एका विजयाची गरज आहे.पुढच्या सर्व मॅचसाठी विजयी टीममध्ये फारसे बदल करणार नसल्याचे संकेत कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं दिले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर टीममध्ये परतल्यानं भारताची बॅटिंग साईड मजबूत झाली आहे. पण असं असलं तरी बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करावा लागणार आहे. दुसरीकडे इंग्लंड टीमवरचा दबाव आणखीच वाढला आहे. सीरिजमध्ये टीकून राहण्यासाठी त्यांना चौथी वनडे जिंकावीच लागणार आहे. पहिल्या तीन वन-डेमध्ये इंग्लंडनं स्पिनर खेळवला नव्हता. त्यामुळे मंद गतीच्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फास्ट बॉलर्सना सपाटून मार खावा लागला. साहजिकच चौथ्या वन-डेत इंग्लंडला आपली रणनिती बदलावी लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2008 06:13 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2008 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close