S M L

'लोकपाल'चा तिढा कायम

23 मार्चहिवाळी अधिवेशात मंजूर न होऊ शकलेलं लोकपाल विधेयक बजेट अधिवेशनात तरी मंजूर व्हावं यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली. पण ती निष्फळ ठरली. तर तिकडे अण्णा हजारे यांनीही लोकपालसाठी पुन्हा एकदा कंबर कसली. केंद्राच्या हिवाळी अधिवेशात लोकपाल विधेयकाचा हा असा शेवट झाला. तीन महिन्यांनंतर लोकपाल विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी सराकरने पुन्हा प्रयत्न चालवलेत. हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच बजेट अधिवेशनादरम्यानही अण्णांनी सशक्त लोकपालासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचं सरकारनं वारंवार सांगितलंय. पण राज्यसभेत लोकपाल मंजूर करण्यासाठी आवश्यक संख्याबळ उभारणं काँग्रेससाठी कसोटीचे ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2012 09:53 AM IST

'लोकपाल'चा तिढा कायम

23 मार्च

हिवाळी अधिवेशात मंजूर न होऊ शकलेलं लोकपाल विधेयक बजेट अधिवेशनात तरी मंजूर व्हावं यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली. पण ती निष्फळ ठरली. तर तिकडे अण्णा हजारे यांनीही लोकपालसाठी पुन्हा एकदा कंबर कसली.

केंद्राच्या हिवाळी अधिवेशात लोकपाल विधेयकाचा हा असा शेवट झाला. तीन महिन्यांनंतर लोकपाल विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी सराकरने पुन्हा प्रयत्न चालवलेत. हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच बजेट अधिवेशनादरम्यानही अण्णांनी सशक्त लोकपालासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचं सरकारनं वारंवार सांगितलंय. पण राज्यसभेत लोकपाल मंजूर करण्यासाठी आवश्यक संख्याबळ उभारणं काँग्रेससाठी कसोटीचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2012 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close