S M L

पक्षानं योग्य साथ दिली नाही - हर्षवर्धन जाधव

24 मार्चमराठवाड्यात कन्नडमध्ये मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव सध्या आपल्याच पक्षावर नाराज आहेत. आपल्यावरच्या अनेक प्रकरणांमध्ये पक्षानं योग्य साथ दिली नाही अशी त्यांची खंत आहे. मागच्या वर्षी जाधव यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असा आरोप जाधव यांनी केला. राज ठाकरे यांनी या प्रकरणी औरंगाबादमध्ये भव्यसभा घेऊन 'मौका सभी को मिलता है' असा फिल्मी डायलॉग आर.आर.पाटील आणि अजितदादांना सुनावला होता. मात्र ज्या पक्षांवर टीका केली त्याच पक्षाला अलीकडे झालेल्या जिल्हा परिषदेत मनसेने आघाडीला पाठिंबा दिल्याने जाधवांच्या नाराजीत भर पडली. सध्या आपण वेगळा विचार केला नाही मात्र राज ठाकरे यांना भेटून पुढील भुमिका ठरवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2012 10:44 AM IST

पक्षानं योग्य साथ दिली नाही - हर्षवर्धन जाधव

24 मार्च

मराठवाड्यात कन्नडमध्ये मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव सध्या आपल्याच पक्षावर नाराज आहेत. आपल्यावरच्या अनेक प्रकरणांमध्ये पक्षानं योग्य साथ दिली नाही अशी त्यांची खंत आहे. मागच्या वर्षी जाधव यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असा आरोप जाधव यांनी केला. राज ठाकरे यांनी या प्रकरणी औरंगाबादमध्ये भव्यसभा घेऊन 'मौका सभी को मिलता है' असा फिल्मी डायलॉग आर.आर.पाटील आणि अजितदादांना सुनावला होता. मात्र ज्या पक्षांवर टीका केली त्याच पक्षाला अलीकडे झालेल्या जिल्हा परिषदेत मनसेने आघाडीला पाठिंबा दिल्याने जाधवांच्या नाराजीत भर पडली. सध्या आपण वेगळा विचार केला नाही मात्र राज ठाकरे यांना भेटून पुढील भुमिका ठरवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2012 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close