S M L

पेट्रोल दरवाढीचे संकेत

23 मार्चपाच राज्यातील विधानसभा निवडणुका, बजेट 2012-13 पार पडल्यानंतर महागाईनं कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्यांना आता पेट्रोल दरवाढीचाही चटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी पेट्रोल दरवाढीचे संकेत दिले आहे. पेट्रोलच्या किंमतीचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. पण मंत्री गटाच्या बैठकी पुर्वी दरवाढीबाबत कोणतही विधान करणं योग्य ठरणार नाही असंही रेड्डी यांनी यावेळी स्पष्ट केलं. मागिल वर्षी डिसेंबर महिन्यात पेट्रोलची दरवाढ पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे टळली होती. पण चार महिने पेट्रोल कंपन्यांनी धरलेला धीर आता पेट्रोलच्या मोठ्या दरवाढीत होण्याची शक्यता आहे. आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या किमंती गगनाला भिडलेल्या आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरलेली किंमत यामुळे पेट्रोल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. याच संदर्भात पेट्रोल कंपन्यांनी सरकारकडे किमंती वाढवण्याची मागणी केली होती. यंदाच्या आर्थिक बजेटमध्ये पेट्रोलच्या किमंती वाढतील अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. एकीकडे महागाईच्या खाईत होरपाळलेल्या सर्वसामान्य जनतेला याच बजेटामधून खिसा कापला गेला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमंती किती वाढणार आणि केंव्हा वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2012 12:12 PM IST

पेट्रोल दरवाढीचे संकेत

23 मार्च

पाच राज्यातील विधानसभा निवडणुका, बजेट 2012-13 पार पडल्यानंतर महागाईनं कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्यांना आता पेट्रोल दरवाढीचाही चटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी पेट्रोल दरवाढीचे संकेत दिले आहे. पेट्रोलच्या किंमतीचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. पण मंत्री गटाच्या बैठकी पुर्वी दरवाढीबाबत कोणतही विधान करणं योग्य ठरणार नाही असंही रेड्डी यांनी यावेळी स्पष्ट केलं. मागिल वर्षी डिसेंबर महिन्यात पेट्रोलची दरवाढ पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे टळली होती. पण चार महिने पेट्रोल कंपन्यांनी धरलेला धीर आता पेट्रोलच्या मोठ्या दरवाढीत होण्याची शक्यता आहे. आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या किमंती गगनाला भिडलेल्या आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरलेली किंमत यामुळे पेट्रोल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. याच संदर्भात पेट्रोल कंपन्यांनी सरकारकडे किमंती वाढवण्याची मागणी केली होती. यंदाच्या आर्थिक बजेटमध्ये पेट्रोलच्या किमंती वाढतील अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. एकीकडे महागाईच्या खाईत होरपाळलेल्या सर्वसामान्य जनतेला याच बजेटामधून खिसा कापला गेला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमंती किती वाढणार आणि केंव्हा वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2012 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close