S M L

नवी मुंबईतील रिक्षाचालकांचा संप मागे

23 मार्चगेली चार दिवस नवीमुंबईकरांना वेठीस धरुन रिक्षाचालकांनी पुकारलेला बेमुदत संप अखेर मागे घेतला आहे. आरटीओच्या मध्यस्थीनंतर रिक्षा युनियनने अखेर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. रिक्षांच्या भाडेकपातीच्या निर्णयाविरोधात गेल्या चार दिवसांपासून नवी मुंबईत रिक्षा बंद होत्या. पण आरटीओच्या अधिकार्‍यांनी रिक्षा युनियनची समजूत काढली आणि आता भाडेकपातीचा निर्णय मान्य असल्याचं युनियनचं म्हणणं आहे. पण युनियनच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन आरटीओच्या पदाधिकार्‍यांनी दिल्यानंतर युनियनने संप मागे घेतला आहे. रिक्षाचालकांच्या या संपामुळे नवीमुंबईकरांचे हाल झाले. या संपाच्या विरोधाता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याकर्त्यांनी आंदोलन केले होते. संप मागे घ्यावी अशी विनंतीही करण्यात आली होती. एव्हान एवढच नाही तर खुद्द कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनातून प्रवाश्यांना सोडले होते. चार दिवस रिक्षाचालकांनी भाडेकपातीच्या विरोधात आंदोलन केले आणि भाडेकपात मान्य आहे म्हणून संप मागे घेतला. नेमके या संपातून युनियनला काय सिध्द करायचे होते असा सवाल नागरिक विचारत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2012 02:00 PM IST

नवी मुंबईतील रिक्षाचालकांचा संप मागे

23 मार्च

गेली चार दिवस नवीमुंबईकरांना वेठीस धरुन रिक्षाचालकांनी पुकारलेला बेमुदत संप अखेर मागे घेतला आहे. आरटीओच्या मध्यस्थीनंतर रिक्षा युनियनने अखेर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. रिक्षांच्या भाडेकपातीच्या निर्णयाविरोधात गेल्या चार दिवसांपासून नवी मुंबईत रिक्षा बंद होत्या. पण आरटीओच्या अधिकार्‍यांनी रिक्षा युनियनची समजूत काढली आणि आता भाडेकपातीचा निर्णय मान्य असल्याचं युनियनचं म्हणणं आहे. पण युनियनच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन आरटीओच्या पदाधिकार्‍यांनी दिल्यानंतर युनियनने संप मागे घेतला आहे.

रिक्षाचालकांच्या या संपामुळे नवीमुंबईकरांचे हाल झाले. या संपाच्या विरोधाता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याकर्त्यांनी आंदोलन केले होते. संप मागे घ्यावी अशी विनंतीही करण्यात आली होती. एव्हान एवढच नाही तर खुद्द कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनातून प्रवाश्यांना सोडले होते. चार दिवस रिक्षाचालकांनी भाडेकपातीच्या विरोधात आंदोलन केले आणि भाडेकपात मान्य आहे म्हणून संप मागे घेतला. नेमके या संपातून युनियनला काय सिध्द करायचे होते असा सवाल नागरिक विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2012 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close