S M L

क्रांतीसिंह नागनाथअण्णा नायकवडींना अखेरचा निरोप

23 मार्चक्रांतीसिंह नागनाथअण्णा नायकवडी यांना अखेरचा निरोप देण्यात आला सांगली जिल्ह्यातल्या वाळवा या त्यांच्या जन्मगावी हुतात्मा अहीर महाविद्यालयातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. हुतात्मा कारखाना परिसरातल्या साखर शाळेच्या आवारात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला गृहमंत्री आर.आर.पाटील, पतंगराव कदम, जयंत पाटील, रामदास आठवले यांच्यासोबत प्रकाश आमटेही उपस्थित होते. नागनाथअण्णांच्या निधनामुळे वाळवा गावात आज गुढीपाडवा साजरा केला गेला नाही. गावातील सगळे व्यवहार आज बंद ठेवण्यात आले होते. गावात कोणीही गुढी उभारली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2012 01:58 PM IST

क्रांतीसिंह नागनाथअण्णा नायकवडींना अखेरचा निरोप

23 मार्च

क्रांतीसिंह नागनाथअण्णा नायकवडी यांना अखेरचा निरोप देण्यात आला सांगली जिल्ह्यातल्या वाळवा या त्यांच्या जन्मगावी हुतात्मा अहीर महाविद्यालयातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. हुतात्मा कारखाना परिसरातल्या साखर शाळेच्या आवारात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला गृहमंत्री आर.आर.पाटील, पतंगराव कदम, जयंत पाटील, रामदास आठवले यांच्यासोबत प्रकाश आमटेही उपस्थित होते. नागनाथअण्णांच्या निधनामुळे वाळवा गावात आज गुढीपाडवा साजरा केला गेला नाही. गावातील सगळे व्यवहार आज बंद ठेवण्यात आले होते. गावात कोणीही गुढी उभारली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2012 01:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close