S M L

शाळेत 'पॉर्न व्हिडिओ'पाहण्याचा धक्कादायक प्रकार उघड

24 मार्चशाळा म्हणजे ज्ञानाचे भांडार...शाळेत शिक्षण घेणार प्रत्येक विद्यार्थी हा भावी आयुष्याचा पाया असतो. पण याच विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार पडले तर उद्या भवितव्य कसे असेल याचा विचार करूनच भीती वाटते पण गडचिरोलीत एका जिल्हा परिषदेत पॉर्न व्हिडिओ पाहण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही बाब गावकर्‍यांच्या लक्षात येताच त्यांना धक्काच बसला. जिल्हातल्या चार्मोशी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गेल्या 8 दिवसापासून अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे उघडकीस आलं आहे. मक्केपल्ली जिल्हा परिषद शाळेतील ही घटना आहे. हा प्रकार समजताच संतप्त पालकांनी शाळेला कुलुप ठोकलं. गेल्या 3 दिवसांपासून शाळा बंद आहे. शिक्षकांना या प्रकाराची माहिती असूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला. मात्र इथल्या कॉम्प्युटरवर हे व्हिडिओ कुणी डाउनलोड केली, हे अजून समजलेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2012 03:31 PM IST

शाळेत 'पॉर्न व्हिडिओ'पाहण्याचा धक्कादायक प्रकार उघड

24 मार्च

शाळा म्हणजे ज्ञानाचे भांडार...शाळेत शिक्षण घेणार प्रत्येक विद्यार्थी हा भावी आयुष्याचा पाया असतो. पण याच विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार पडले तर उद्या भवितव्य कसे असेल याचा विचार करूनच भीती वाटते पण गडचिरोलीत एका जिल्हा परिषदेत पॉर्न व्हिडिओ पाहण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही बाब गावकर्‍यांच्या लक्षात येताच त्यांना धक्काच बसला. जिल्हातल्या चार्मोशी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गेल्या 8 दिवसापासून अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे उघडकीस आलं आहे. मक्केपल्ली जिल्हा परिषद शाळेतील ही घटना आहे. हा प्रकार समजताच संतप्त पालकांनी शाळेला कुलुप ठोकलं. गेल्या 3 दिवसांपासून शाळा बंद आहे. शिक्षकांना या प्रकाराची माहिती असूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला. मात्र इथल्या कॉम्प्युटरवर हे व्हिडिओ कुणी डाउनलोड केली, हे अजून समजलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2012 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close