S M L

औरंगाबादेत एन्काऊंटरमध्ये सीमीचा दहशतवादी ठार

26 मार्चऔरंगाबादमध्ये आज एटीएसने केलेल्या एन्काऊंटरमध्ये सिमीचा संशयित अतिरेकी ठार झाला. खलील कुरेशी असं त्याचं नाव आहे. इतर 2 संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत एक पोलीस कॉन्स्टेबलही जखमी झाला आहे. अहमदाबादमध्ये 2008 साली अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात औरंगाबादमध्ये अटक झालेल्या अतिरेक्यांचा हात होता, असं सांगितलं जातंय. बाबरी मस्जीद खटल्याची सुनावणी करणार्‍या न्यायाधीशांच्या हत्येच्या कटातही खलीलचा सहभाग होता. औरंगाबादमधल्या हिमायत बाग परिसरात हे एन्काऊंटर झालं. या तीन अतिरेक्यांनी एटीएसच्या टीमवर गोळीबार केला. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 रिव्हॉल्वर्स जप्त केले आहेत

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2012 01:10 PM IST

औरंगाबादेत एन्काऊंटरमध्ये सीमीचा दहशतवादी ठार

26 मार्च

औरंगाबादमध्ये आज एटीएसने केलेल्या एन्काऊंटरमध्ये सिमीचा संशयित अतिरेकी ठार झाला. खलील कुरेशी असं त्याचं नाव आहे. इतर 2 संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत एक पोलीस कॉन्स्टेबलही जखमी झाला आहे. अहमदाबादमध्ये 2008 साली अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात औरंगाबादमध्ये अटक झालेल्या अतिरेक्यांचा हात होता, असं सांगितलं जातंय. बाबरी मस्जीद खटल्याची सुनावणी करणार्‍या न्यायाधीशांच्या हत्येच्या कटातही खलीलचा सहभाग होता. औरंगाबादमधल्या हिमायत बाग परिसरात हे एन्काऊंटर झालं. या तीन अतिरेक्यांनी एटीएसच्या टीमवर गोळीबार केला. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 रिव्हॉल्वर्स जप्त केले आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2012 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close