S M L

भरवस्तीत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

26 मार्चनाशिकच्या भरवस्तीत धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलं आहे. आज सकाळी पंचवटी भागातल्या गजानन कॉलनी इथल्या संतकृपा बंगल्यात बिबट्या घुसला होता. या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका लहान मुलीसह 3 जण जखमी झाले. बंगल्यात बिबट्या घुसल्यामुळे एकच थरकाप उडाला. बंगल्यातील सदस्यांनी घराचे बाहेर पळ काढला. आणि घराची दार,खिडक्या बाहेरून बंद करून घेतली. घरात बिबट्या घुसला ही वार्ता पसरताच बंगल्याभोवती लोकांनी एकच गर्दी केली. काही हौशी वीरांनी बंगल्यात घुसण्याचा प्रवेश केला. पण बिबट्याची गुरगुर ऐकून पाऊलं मागे वळवली. वनविभागाने घटनास्थळाचा ताबा घेत बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. वनविभागाच्या अधिकार्‍यंानी इंजेकशनच्या साहाय्याने बिबट्याला बेशुध्द केलं. चार तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला अखेर पकडण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2012 12:57 PM IST

भरवस्तीत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

26 मार्च

नाशिकच्या भरवस्तीत धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलं आहे. आज सकाळी पंचवटी भागातल्या गजानन कॉलनी इथल्या संतकृपा बंगल्यात बिबट्या घुसला होता. या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका लहान मुलीसह 3 जण जखमी झाले. बंगल्यात बिबट्या घुसल्यामुळे एकच थरकाप उडाला. बंगल्यातील सदस्यांनी घराचे बाहेर पळ काढला. आणि घराची दार,खिडक्या बाहेरून बंद करून घेतली. घरात बिबट्या घुसला ही वार्ता पसरताच बंगल्याभोवती लोकांनी एकच गर्दी केली. काही हौशी वीरांनी बंगल्यात घुसण्याचा प्रवेश केला. पण बिबट्याची गुरगुर ऐकून पाऊलं मागे वळवली. वनविभागाने घटनास्थळाचा ताबा घेत बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. वनविभागाच्या अधिकार्‍यंानी इंजेकशनच्या साहाय्याने बिबट्याला बेशुध्द केलं. चार तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला अखेर पकडण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2012 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close