S M L

पुण्यात 3 सराईत दरोडेखोरांना अटक

27 मार्चपुण्यातील बिजलीनगर भागात दरोडा टाकायला निघालेल्या 3 सराईत दरोडेखोरांना पुणे गुन्हे शाखेनं अटक केली. अमोल ओव्हाळ, परवेज हानिफ शेख आणि विजय कोळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या तिनही आरोपींनी सांगलीतील सचिन ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटला होता. या सर्व आरोपींकडून पोलिसांनी एक किलो 80 ग्रॅम सोनं, 7 किलो 800 ग्रॅम चांदी, 2 लाख रूपये रोख, एक मोटार सायकल, एक होंडा सिटीकार आणि घातक शस्त्र साठयासह एकूण 37 लाख 61 हजार रूपयाचा मुद्दे माल जप्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2012 07:41 AM IST

पुण्यात 3 सराईत दरोडेखोरांना अटक

27 मार्च

पुण्यातील बिजलीनगर भागात दरोडा टाकायला निघालेल्या 3 सराईत दरोडेखोरांना पुणे गुन्हे शाखेनं अटक केली. अमोल ओव्हाळ, परवेज हानिफ शेख आणि विजय कोळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या तिनही आरोपींनी सांगलीतील सचिन ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटला होता. या सर्व आरोपींकडून पोलिसांनी एक किलो 80 ग्रॅम सोनं, 7 किलो 800 ग्रॅम चांदी, 2 लाख रूपये रोख, एक मोटार सायकल, एक होंडा सिटीकार आणि घातक शस्त्र साठयासह एकूण 37 लाख 61 हजार रूपयाचा मुद्दे माल जप्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2012 07:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close