S M L

..तेंव्हा लष्करप्रमुखांनी कारवाईला नकार दिला - संरक्षणमंत्री

27 मार्चलष्करप्रमुख जनरल व्ही . के. सिंग यांनी केलेल्या गौप्यस्फोट प्रकरणाची टेप उपलब्ध असल्याचा दावा निवृत्त लष्करी अधिकारी आर एस एन सिंग यांनीकेला आहे. या टेपमध्ये ज्या व्यक्तीनं सिंग यांना 14 कोटींची ऑफर दिली होती, त्या व्यक्तीचा आवाजही आहे. व्ही. के. सिंग यांच्याआधीच्या लष्करप्रमुखांसोबत असलेली संभाषणही या टेपमध्ये आहेत. यानंतर लष्करप्रमुख संबंधित व्यक्तीला ऑफिसच्या बाहेर जायला सांगत असल्याचा आवाजही रेकॉर्ड झाला आहे. दरम्यान, याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन आज संरक्षणमंत्री ए.के.ऍन्टनी यांनी सभागृहाला दिलं.तर सिंग यांनी बाब उघड केली. पण लष्करप्रमुखांनीच या प्रकरणी कारवाई करण्यास नकार दिला होता असा खुलासाही ऍन्टनी यांनी केला. तर याचवेळी संरक्षणमंत्र्यांनी कारवाई का केली नाही असा सवाल विरोधकांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2012 12:16 PM IST

..तेंव्हा लष्करप्रमुखांनी कारवाईला नकार दिला - संरक्षणमंत्री

27 मार्च

लष्करप्रमुख जनरल व्ही . के. सिंग यांनी केलेल्या गौप्यस्फोट प्रकरणाची टेप उपलब्ध असल्याचा दावा निवृत्त लष्करी अधिकारी आर एस एन सिंग यांनीकेला आहे. या टेपमध्ये ज्या व्यक्तीनं सिंग यांना 14 कोटींची ऑफर दिली होती, त्या व्यक्तीचा आवाजही आहे. व्ही. के. सिंग यांच्याआधीच्या लष्करप्रमुखांसोबत असलेली संभाषणही या टेपमध्ये आहेत. यानंतर लष्करप्रमुख संबंधित व्यक्तीला ऑफिसच्या बाहेर जायला सांगत असल्याचा आवाजही रेकॉर्ड झाला आहे. दरम्यान, याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन आज संरक्षणमंत्री ए.के.ऍन्टनी यांनी सभागृहाला दिलं.तर सिंग यांनी बाब उघड केली. पण लष्करप्रमुखांनीच या प्रकरणी कारवाई करण्यास नकार दिला होता असा खुलासाही ऍन्टनी यांनी केला. तर याचवेळी संरक्षणमंत्र्यांनी कारवाई का केली नाही असा सवाल विरोधकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2012 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close