S M L

शिवाजी पार्कबद्दल राज्य सरकारचे केंद्राकडे साकडं

28 मार्चशिवाजी पार्कच्या सायलेन्स झोनची अट शिथील करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे केली आहे. विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ही मागणी केली होती. शिवाजी पार्कचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता राज्य सरकारने या विनंतीचा विचार करावा असंही विनोद तावडे याचं म्हणणं आहे. आज त्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना पर्यावरण राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी ही माहिती दिली. मैदान,पार्कवर सभा घेऊ देत नसाल तर निवडणुका घेताच कशाला असा खणखणीत सवाल केला होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. महापालिका निवडणूक प्रचाराच्यावेळी मनसेनं शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी मागितली मात्र हायकोर्टाने सायलेन्स झोन सांगत मागणी फेटाळून लावली यानंतर पार्कवरुन राजकीय वादळ निर्माण झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुध्दा राज यांच्या मुद्याचा धागा पकडून पार्क प्रचारासाठी खुले केली पाहिजे असा सुर लगावला होता. आज पुन्हा एकदा अधिवेशनात शिवाजी पार्कला नो सायलेन्स झोन करण्यात यावे या मागणीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे मागणी केली आहे. आता राज्यसरकारच्या यामागणीवर केंद्र काय निर्णय देते हे महत्वाचे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2012 12:33 PM IST

शिवाजी पार्कबद्दल राज्य सरकारचे केंद्राकडे साकडं

28 मार्च

शिवाजी पार्कच्या सायलेन्स झोनची अट शिथील करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे केली आहे. विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ही मागणी केली होती. शिवाजी पार्कचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता राज्य सरकारने या विनंतीचा विचार करावा असंही विनोद तावडे याचं म्हणणं आहे. आज त्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना पर्यावरण राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी ही माहिती दिली.

मैदान,पार्कवर सभा घेऊ देत नसाल तर निवडणुका घेताच कशाला असा खणखणीत सवाल केला होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. महापालिका निवडणूक प्रचाराच्यावेळी मनसेनं शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी मागितली मात्र हायकोर्टाने सायलेन्स झोन सांगत मागणी फेटाळून लावली यानंतर पार्कवरुन राजकीय वादळ निर्माण झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुध्दा राज यांच्या मुद्याचा धागा पकडून पार्क प्रचारासाठी खुले केली पाहिजे असा सुर लगावला होता. आज पुन्हा एकदा अधिवेशनात शिवाजी पार्कला नो सायलेन्स झोन करण्यात यावे या मागणीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे मागणी केली आहे. आता राज्यसरकारच्या यामागणीवर केंद्र काय निर्णय देते हे महत्वाचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2012 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close