S M L

काका- पुतण्याची भेट

23 नोव्हेंबर, मुंबईविनोद तळेकर'अडीच वर्षांनंतर शिवसेनाप्रमुखांशी माझी भेट झाली. फोनवर आमचं बोलणं होतंच. राजकारण सोडून द्या. पण त्यांना भेटल्यानंतर मला खूप समाधान लाभलं ', अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटून आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.आज सकाळी राज ठाकरे मातोश्रीवर जाणार असल्याच्या वृत्तानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कविर्तकाला वेग आला होता. शिवसेनाप्रमुखांना भेटून आल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं की, ही साधी भेट होती. शिवसेनाप्रमुखांजवळील व्यंगचित्रकार डेव्हिड लो आणि बॅन बेरी यांची पुस्तकं माझ्याजवळ होती. या पुस्तकांबाबत त्यांनी फोन करुन विचारलं होतं. मी म्हटलं पाठवून देतो. मी नंतर म्हणालो, मीच घेऊन येऊ का ? ते हो म्हणाले. अडीच वर्षांनंतर आमची ही भेट झाली. त्यांना भेटून मला समाधान मिळालं. दीड तास गप्पा झाल्या. या गप्पांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. भेटीत राजकारणावर चर्चा झाली का ? या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं. यावेळी संजय राऊत ही बैठकीला उपस्थित होते. ही कौंटुबिक भेट असल्याचं सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2008 12:04 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2008 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close