S M L

पुण्यात तलवारीच्या धाकावर केली घरं जमीनदोस्त

28 मार्चपुण्यातील हांडेवाडी भागात तलवारीच्या धाकावर काही घरं आणि व्यापारी प्रतिष्ठान जमीनदोस्त केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी नजीर शेख आणि आयुब बशीर खान यांनी 40 ते 50 साथीदारांसह हांडेवाडी भागात काल मध्यरात्री धडक मारली. इथल्या रहिवाशांना धमकावत त्यांनी पाच घरं आणि व्यापारी प्रतिष्ठान जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त केली. जागेची वैध कागदपत्र असतानाही आरोपी नजीर शेख आणि आयुब बशीर हे आपली जागा बळकावत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला. पोलिसांनी या प्रकरणात 15 आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सहा आरोपीनांच अटक करण्यात आली आहेत. मात्र मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे.हांडेवाडी भागातील गट नबंर 63 या जागेवर जितेंद्र परमार, हाफीज शेख, प्रेमन वल्लाकडे, शंकर संसाणे आणि आसीफ शेख यांची घर आणि व्यापारी प्रतिष्ठान आहेत. आरोपी नजीर शेख आणि आयूब बशीर खान यांनी गट नबंर 63 ही जागा आपली असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. आरोपी नजीर शेख आणि आयूब बशीर खान यांनी मध्य रात्री आपल्या 40 - 50 सहाकार्‍यासह जेसिबी मशीन आणून गट नबंर 63 वरच्या नागरिकांच्या घराची आणि व्यापारी प्रतिष्ठानची थोडफोड केली आहे. हांडेवाडीत घर आणि व्यापारी प्रतिष्ठान असलेल्या सर्व नागरिकाकडे त्यांच्या जागेची वैध कागद पत्र असताना सुध्दा आरोपी नजीर शेख आणि आयूब बशीर खान हे आपली जागा बळकवत आहेत असा आरोप या नागरिकांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 15 आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सहा आरोपीनाच अटक करण्यात आली आहेत. मात्र मुख्य सुत्रधार अजूनही फरार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2012 04:37 PM IST

पुण्यात तलवारीच्या धाकावर केली घरं जमीनदोस्त

28 मार्च

पुण्यातील हांडेवाडी भागात तलवारीच्या धाकावर काही घरं आणि व्यापारी प्रतिष्ठान जमीनदोस्त केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी नजीर शेख आणि आयुब बशीर खान यांनी 40 ते 50 साथीदारांसह हांडेवाडी भागात काल मध्यरात्री धडक मारली. इथल्या रहिवाशांना धमकावत त्यांनी पाच घरं आणि व्यापारी प्रतिष्ठान जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त केली.

जागेची वैध कागदपत्र असतानाही आरोपी नजीर शेख आणि आयुब बशीर हे आपली जागा बळकावत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला. पोलिसांनी या प्रकरणात 15 आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सहा आरोपीनांच अटक करण्यात आली आहेत. मात्र मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे.

हांडेवाडी भागातील गट नबंर 63 या जागेवर जितेंद्र परमार, हाफीज शेख, प्रेमन वल्लाकडे, शंकर संसाणे आणि आसीफ शेख यांची घर आणि व्यापारी प्रतिष्ठान आहेत. आरोपी नजीर शेख आणि आयूब बशीर खान यांनी गट नबंर 63 ही जागा आपली असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. आरोपी नजीर शेख आणि आयूब बशीर खान यांनी मध्य रात्री आपल्या 40 - 50 सहाकार्‍यासह जेसिबी मशीन आणून गट नबंर 63 वरच्या नागरिकांच्या घराची आणि व्यापारी प्रतिष्ठानची थोडफोड केली आहे.

हांडेवाडीत घर आणि व्यापारी प्रतिष्ठान असलेल्या सर्व नागरिकाकडे त्यांच्या जागेची वैध कागद पत्र असताना सुध्दा आरोपी नजीर शेख आणि आयूब बशीर खान हे आपली जागा बळकवत आहेत असा आरोप या नागरिकांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 15 आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सहा आरोपीनाच अटक करण्यात आली आहेत. मात्र मुख्य सुत्रधार अजूनही फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2012 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close