S M L

एलपीजीच्या करात 2 टक्क्यांनी कपात

29 मार्चमहागाईनं त्रस्त असलेल्या राज्यातील जनतेला अर्थमंत्री अजित पवार यांनी काहीअंशी दिलासा दिला आहे. एलपीजी गॅस आणि केरोसिनवरील कर राज्यसरकारकडून 2 टक्क्याने कमी करण्यात आला आहे. आता हा कर 5 टक्क्यांऐवजी 3 टक्के करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. यामुळे सिलेंडरमागे 8 रूपये कमी होणार आहे. 26 मार्चला अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता आणि यात त्यांनी एलपीजीवर 5 टक्के करवाढ केली होती. यामुळे प्रत्येक सिलेंडरवर 20 ते 22 रुपये जास्त मोजावे लागणार होते. पण या दरवाढीवर राज्यभरात नाराजीचा सूर दिसून आला. विरोधकांबरोबरच सत्ताधार्‍यांनीही याला विरोध केला होता. खुद्द आघाडीच्या अनेक नेत्यांनी या दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2012 04:50 PM IST

एलपीजीच्या करात 2 टक्क्यांनी कपात

29 मार्च

महागाईनं त्रस्त असलेल्या राज्यातील जनतेला अर्थमंत्री अजित पवार यांनी काहीअंशी दिलासा दिला आहे. एलपीजी गॅस आणि केरोसिनवरील कर राज्यसरकारकडून 2 टक्क्याने कमी करण्यात आला आहे. आता हा कर 5 टक्क्यांऐवजी 3 टक्के करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. यामुळे सिलेंडरमागे 8 रूपये कमी होणार आहे. 26 मार्चला अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता आणि यात त्यांनी एलपीजीवर 5 टक्के करवाढ केली होती. यामुळे प्रत्येक सिलेंडरवर 20 ते 22 रुपये जास्त मोजावे लागणार होते. पण या दरवाढीवर राज्यभरात नाराजीचा सूर दिसून आला. विरोधकांबरोबरच सत्ताधार्‍यांनीही याला विरोध केला होता. खुद्द आघाडीच्या अनेक नेत्यांनी या दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2012 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close