S M L

राजकीय पक्षांच्या फायद्याचं सॉफ्टवेअर

23 नोव्हेंबर, मुंबई उदय जाधव महाराष्ट्रातही आता इलेक्शन फिवर हळूहळू वाढू लागलाय. उमेदवारांनीही आपली तयारी सुरू केलीय. निवडणूक जिंकायची असेल तर उमेदवारांकडे मतदारांचा पूर्ण डेटा असावा लागतो पण निवडणूक आयोगानं दिलेली मतदारांची माहिती उमेदवारांसाठी पुरेशी ठरत नाही. उमेदवारांची ही गरज ठाण्यातील एका जोडप्यानं पूर्ण केली आहे. त्यांनी यासाठी एक सॉफ्टवेअरच तयार केलंय.ठाण्यात राहणार्‍या शिरीष आणि अलका मांजरेकर यांनी उमेदवारांना मतदारांची माहिती ज्या पद्धतीनं हवीय, तशी देणारं सॉफ्टवेअर त्यांनी बनवलंय. उमेदवारांसाठी ते उपयोगी आहे, असं ते सांगतात. निवडणूक आयोग करत असलेल्या मतदारांच्या यादीतून उमेदवारांना त्यांची वोट बँक समजत नाही. उमेदवारांची नेमकी हीच गरज मांजरेकर वोटर्स मॅनेजमेंटचे सॉफ्टवेअर करतं. ' सर्वात अधिक मतदार कुठल्या भागात आहेत. महिला आणि पुरुष मतदारांची संख्या, या सॉफ्टवेअरमधून कळणं सोपं जाणार आहे ', असं अलका मांजरेकर यांनी सांगितलं. मांजरेकर वोटर्स मॅनेजमेंटच्या या सॉफ्टवेअरमुळे उमेदवारांची आयतीच सोय झाली आहे. उमेदवारांचं बरंचंसं काम यामुळं हलकं होणार आहे. याचा फायदा करुन घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या अशा सर्वच राजकीय पक्षांचे आपापली वोट बँक समजून घेण्यासाठी मांजरेकरांकडे येत आहेत. मांजरेकर वोटर्स मॅनेजमेंटकडून एका विधानसभेच्या पाहिजे तशा, मतदारयादीचं सॉफ्टवेअर पाच दिवसात बनवून मिळतं आणि त्यासाठी खर्च येतो 15 हजार रुपये. निवडणूक जिंकण्यासाठी आटापिटा करणार्‍या उमेदवारांना ही किंमत निश्चितच जास्त नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2008 01:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2008 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close