S M L

मावळ गोळीबार प्रकरणी 48 शेतकर्‍यांना न्यायालयीन कोठडी

30 मार्चमावळ गोळीबार प्रकरणी 49 शेतकर्‍यांना आज अटक करण्यात आली. त्यापैकी 48 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर 1 आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुटका झाली आहे. चौकशीसाठी बोलवून या शेतकर्‍यांना अटक करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या सर्व शेतकर्‍यांवर दंगल घडवणे, सरकारी मालमत्तेचं नूकसान आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे यापुर्वी दाखल होते. मागिल वर्षी 9 ऑगस्टला मावळच्या शेतकर्‍यांनी पवना धरणातून जलवाहिनीसाठी आंदोलन केलं होतं. यावेळी शेतकर्‍यांनी मुंबई-पुणे महामार्ग रोखून धरला होता. पोलिसांनी आंदोलनला मज्जाव केला असता शेतकर्‍यांनी पोलिसांनी दगडफेक केली.तसेच पोलिसांच्या वाहनं पेटवून दिली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 3 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राज्यभरातून निषेध करण्यात आला शेतकर्‍यांवर गोळीबार का करण्यात या प्रश्नावर विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले होते. आज याच प्रकरणी 49 शेतकर्‍यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 48 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर एकची सुटका करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2012 05:41 PM IST

मावळ गोळीबार प्रकरणी 48 शेतकर्‍यांना न्यायालयीन कोठडी

30 मार्चमावळ गोळीबार प्रकरणी 49 शेतकर्‍यांना आज अटक करण्यात आली. त्यापैकी 48 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर 1 आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुटका झाली आहे. चौकशीसाठी बोलवून या शेतकर्‍यांना अटक करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या सर्व शेतकर्‍यांवर दंगल घडवणे, सरकारी मालमत्तेचं नूकसान आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे यापुर्वी दाखल होते.

मागिल वर्षी 9 ऑगस्टला मावळच्या शेतकर्‍यांनी पवना धरणातून जलवाहिनीसाठी आंदोलन केलं होतं. यावेळी शेतकर्‍यांनी मुंबई-पुणे महामार्ग रोखून धरला होता. पोलिसांनी आंदोलनला मज्जाव केला असता शेतकर्‍यांनी पोलिसांनी दगडफेक केली.तसेच पोलिसांच्या वाहनं पेटवून दिली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 3 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राज्यभरातून निषेध करण्यात आला शेतकर्‍यांवर गोळीबार का करण्यात या प्रश्नावर विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले होते. आज याच प्रकरणी 49 शेतकर्‍यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 48 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर एकची सुटका करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2012 05:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close