S M L

ठाण्यात तुळजाभवानी मंदिरात चोरीप्रकरणी एकाला अटक

01 एप्रिलठाण्यातल्या पाचपाखाडी परिसरात असणार्‍या तुळजाभवानी मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी एका जणाला अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाखाचे दागिने जप्त केले आहेत. संतोष गुळेकर असं या आरोपीचं नाव आहे. सकाळी चोरट्यांनी देवीचे दागिणे लंपास केले हे कळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या 5 तासात आरोपीला अटक केली. दोनच आठवड्यापूर्वी दिवेआगारच्या सुवर्णगणेश मूर्ती चोरी झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेना भाजपने विधानसभेत महाआरतीकरून 14 आमदारांचे निलंबन ओढावून घेतले या सर्व घटनामध्ये पुन्हा एकदा ठाण्याच्या महाकाली मंदिरातही चोरी झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2012 11:29 AM IST

ठाण्यात तुळजाभवानी मंदिरात चोरीप्रकरणी एकाला अटक

01 एप्रिल

ठाण्यातल्या पाचपाखाडी परिसरात असणार्‍या तुळजाभवानी मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी एका जणाला अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाखाचे दागिने जप्त केले आहेत. संतोष गुळेकर असं या आरोपीचं नाव आहे. सकाळी चोरट्यांनी देवीचे दागिणे लंपास केले हे कळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या 5 तासात आरोपीला अटक केली. दोनच आठवड्यापूर्वी दिवेआगारच्या सुवर्णगणेश मूर्ती चोरी झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेना भाजपने विधानसभेत महाआरतीकरून 14 आमदारांचे निलंबन ओढावून घेतले या सर्व घटनामध्ये पुन्हा एकदा ठाण्याच्या महाकाली मंदिरातही चोरी झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2012 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close