S M L

तात्रा लष्करी ट्रक खरेदीत घोटाळा ?

30 मार्चलष्करप्रमुख व्हि.के. सिंग यांना लाच प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहे. या प्रकरणात आज कर्नाटकातल्या एका कामगार नेत्याने धक्कादायक गौप्यस्फोट केला. लष्करासाठी तात्रा या कंपनीकडून घेतलेल्या लष्करी ट्रकच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप कामगार नेते हनुमंतप्पा यांनी केला. याबाबत 2009 सालीच पंतप्रधान, राष्ट्रपती, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, संरक्षण मंत्री आणि गुलाम नबी आझाद यांना पत्र लिहल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तात्रा लष्करी ट्रक खरेदीत घोटाळा झाल्याची बाब ही सोनिया गांधींनाही होती अशी चर्चा आहे.दरम्यान, कर्नाटकच्या कामगार नेत्यांच्या आरोपानंतर भाजपने संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावरुन राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. तात्रा लष्करी ट्रक खरेदीत गैरव्यवहार झाल्याची लिखीत तक्रार संरक्षण मंत्र्यांकडे येऊनही त्यांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे संरक्षण मंत्र्यांनापदावर राहण्याचा अधिकार नसल्याचा आरोप भाजपनं केला. तर भाजपच्या आरोपांनंतर संरक्षण मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. याप्रकरणी तपास सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. पण जर तपास सुरु असेल तर तीन वर्षांनंतरही तो पूर्ण झाला नाही का ? हा प्रश्न उरतो. दरम्यानष लष्कर प्रमुख लाच प्रकरणात सीबीआयनं आज भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला. तात्रा कंपनीचे प्रमुख रवी ऋषी यांची चौकशीही केली. या प्रकरणी दिल्ली आणि बंगळुरुमध्ये छापेही टाकण्यात आले. तपास योग्य दिशेनं सुरु असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2012 05:24 PM IST

तात्रा लष्करी ट्रक खरेदीत घोटाळा ?

30 मार्च

लष्करप्रमुख व्हि.के. सिंग यांना लाच प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहे. या प्रकरणात आज कर्नाटकातल्या एका कामगार नेत्याने धक्कादायक गौप्यस्फोट केला. लष्करासाठी तात्रा या कंपनीकडून घेतलेल्या लष्करी ट्रकच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप कामगार नेते हनुमंतप्पा यांनी केला. याबाबत 2009 सालीच पंतप्रधान, राष्ट्रपती, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, संरक्षण मंत्री आणि गुलाम नबी आझाद यांना पत्र लिहल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तात्रा लष्करी ट्रक खरेदीत घोटाळा झाल्याची बाब ही सोनिया गांधींनाही होती अशी चर्चा आहे.

दरम्यान, कर्नाटकच्या कामगार नेत्यांच्या आरोपानंतर भाजपने संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावरुन राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. तात्रा लष्करी ट्रक खरेदीत गैरव्यवहार झाल्याची लिखीत तक्रार संरक्षण मंत्र्यांकडे येऊनही त्यांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे संरक्षण मंत्र्यांनापदावर राहण्याचा अधिकार नसल्याचा आरोप भाजपनं केला.

तर भाजपच्या आरोपांनंतर संरक्षण मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. याप्रकरणी तपास सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. पण जर तपास सुरु असेल तर तीन वर्षांनंतरही तो पूर्ण झाला नाही का ? हा प्रश्न उरतो. दरम्यानष लष्कर प्रमुख लाच प्रकरणात सीबीआयनं आज भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला. तात्रा कंपनीचे प्रमुख रवी ऋषी यांची चौकशीही केली. या प्रकरणी दिल्ली आणि बंगळुरुमध्ये छापेही टाकण्यात आले. तपास योग्य दिशेनं सुरु असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2012 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close