S M L

पेट्रोल दरवाढ लांबणीवर

31 मार्चपेट्रोलची दरवाढ लांबणीवर टाकण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळं भारतातील पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा वाढत चालला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही दरवाढ अटळ मानली जातेय. सध्या पेट्रोलच्या किरकोळ विक्रीत दर लीटरमागे 6 रुपये 43 पैसे तोटा सहन करावा लागतेय. 20 टक्के विक्रीकरासहीत हा तोटा दर लीटरमागे 7 रुपये 72 पैसे झाल्याचं पेट्रोलीयम कंपन्यांचं म्हणणं आहे. भारत पेट्रोलीयम, इंडियन ऑईल कार्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलीयम या सरकारी कंपन्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.एप्रिलपासून गोव्यात स्वस्त पेट्रोलएप्रिलपासून गोव्यात मात्र एक लीटर पेट्रोल फक्त 55 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे गोवेकर मनोहर पर्रिकरांवर खुश आहेत. गोव्याचा हा धडा महाराष्ट्रानंही गिरवावा अशी मागणी आता होऊ लागलीये. निवडणुकीत दिलेलं आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पूर्ण केलं. पेट्रोल तब्बल 11 रुपयांनी त्यांनी स्वस्त केलंय. महाराष्ट्रात 70 रुपयांनी मिळणारं पेट्रोल गोव्यात 55 रुपयांना मिळणार आहे. पेट्रोलवरचा व्हॅट कमी केल्यामुळं गोव्याच्या तिजोरीत सुमारे 168 कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी नेमके पर्याय शोधून काढलेत. स्वस्त झालेल्या पेट्रोलचं स्मगलिंग होऊ नये म्हणूनही पर्रिकरांनी खबरदारी घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2012 03:48 PM IST

पेट्रोल दरवाढ लांबणीवर

31 मार्च

पेट्रोलची दरवाढ लांबणीवर टाकण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळं भारतातील पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा वाढत चालला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही दरवाढ अटळ मानली जातेय. सध्या पेट्रोलच्या किरकोळ विक्रीत दर लीटरमागे 6 रुपये 43 पैसे तोटा सहन करावा लागतेय. 20 टक्के विक्रीकरासहीत हा तोटा दर लीटरमागे 7 रुपये 72 पैसे झाल्याचं पेट्रोलीयम कंपन्यांचं म्हणणं आहे. भारत पेट्रोलीयम, इंडियन ऑईल कार्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलीयम या सरकारी कंपन्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

एप्रिलपासून गोव्यात स्वस्त पेट्रोल

एप्रिलपासून गोव्यात मात्र एक लीटर पेट्रोल फक्त 55 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे गोवेकर मनोहर पर्रिकरांवर खुश आहेत. गोव्याचा हा धडा महाराष्ट्रानंही गिरवावा अशी मागणी आता होऊ लागलीये. निवडणुकीत दिलेलं आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पूर्ण केलं. पेट्रोल तब्बल 11 रुपयांनी त्यांनी स्वस्त केलंय. महाराष्ट्रात 70 रुपयांनी मिळणारं पेट्रोल गोव्यात 55 रुपयांना मिळणार आहे. पेट्रोलवरचा व्हॅट कमी केल्यामुळं गोव्याच्या तिजोरीत सुमारे 168 कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी नेमके पर्याय शोधून काढलेत. स्वस्त झालेल्या पेट्रोलचं स्मगलिंग होऊ नये म्हणूनही पर्रिकरांनी खबरदारी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2012 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close