S M L

खंडणीसाठी मित्राने केली मित्राची हत्या

01 एप्रिलपुण्यात 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी शाळेत शिकणार्‍या एका मित्राने आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम शिर्के असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. शुभम हा प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी आहे. शुभमच्या हत्येप्रकरणी शुभमचा मित्र अमित नायर यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलं आहे. शुभमला त्याच्या मित्रांनी काल फोन करून दिघी जवळ बोलावून घेतले. नंतर जवळच्या जंगलात नेऊन त्याचा पट्‌ट्याने गळा दाबून खून केला. त्याआधी शुभमच्या वडिलांकडून त्यांनी 15 हजारांची खंडणी वसूल केली होती. तुमचा मुलगा तुम्हाला मिळेल असं त्यांनी सांगितलं. मात्र शुभम रात्रीनंतरही घरी परत न आल्याने शेवटी वडिलांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता हा प्रकार उघडकीस आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2012 09:46 AM IST

खंडणीसाठी मित्राने केली मित्राची हत्या

01 एप्रिल

पुण्यात 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी शाळेत शिकणार्‍या एका मित्राने आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम शिर्के असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. शुभम हा प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी आहे. शुभमच्या हत्येप्रकरणी शुभमचा मित्र अमित नायर यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलं आहे. शुभमला त्याच्या मित्रांनी काल फोन करून दिघी जवळ बोलावून घेतले. नंतर जवळच्या जंगलात नेऊन त्याचा पट्‌ट्याने गळा दाबून खून केला. त्याआधी शुभमच्या वडिलांकडून त्यांनी 15 हजारांची खंडणी वसूल केली होती. तुमचा मुलगा तुम्हाला मिळेल असं त्यांनी सांगितलं. मात्र शुभम रात्रीनंतरही घरी परत न आल्याने शेवटी वडिलांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता हा प्रकार उघडकीस आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2012 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close