S M L

मुख्यमंत्र्यांनीही केलं मजुरांसोबत सहभोजन

01 एप्रिलकाँग्रेसचा युवराज राहुल गांधी कोणालाही न सांगता कुठे ही जाणार...अचानक गरीब शेतकर्‍यांच्या, दलितांच्या घरी प्रकटणार आणि त्यांच्यासोबत जेवण करणार एव्हान एवढंच नाही तर शेतकर्‍यांसोबत शेतावर कामही करुन दाखवणार. आता राहुल गांधी स्वत:अस काही करुन दाखवता म्हटल्यावर आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही युवराजांच्या पाऊलावर पाऊल ठेवलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात पांगरी या छोट्या खेड्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचं बांधकाम सुरु आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांचे शिष्टमंडळ दाखल झाले. भर उन्हात सर्व काम पाहुन झाल्यानंतर सर्व जण एका झाडाखाली थांबले आणि मग मुख्यमंत्र्यांनी तिथल्या मजुरांबरोबर सहभोजन केलं. त्यामुळे सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला. पंतप्रधान कार्यालयातून महाराष्ट्राची धुरा सांभाळण्यासाठी आले पृथ्वीराज चव्हाण चक्क मजुरांसोबत सहभोजन करताय पाहुन शिष्टमंडळ अवाक् झाले. आणि दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री आपल्यासोबत जेवण करताय म्हटल्यावर मजुरांना काय करावे काय नाही असं झालं होतं. मुख्यमंत्र्यांनी सहभोजन केलं यांची बातमी गावात वार्‍यासारखी पसरली अन् कोणाला विश्वास बसो याना बसो पण शेतकरी मजूर मोठ्या अभिमानाने सांगत होते...'म्या मुख्यमंत्र्यांसोबत जेवलो...'

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2012 02:46 PM IST

मुख्यमंत्र्यांनीही केलं मजुरांसोबत सहभोजन

01 एप्रिल

काँग्रेसचा युवराज राहुल गांधी कोणालाही न सांगता कुठे ही जाणार...अचानक गरीब शेतकर्‍यांच्या, दलितांच्या घरी प्रकटणार आणि त्यांच्यासोबत जेवण करणार एव्हान एवढंच नाही तर शेतकर्‍यांसोबत शेतावर कामही करुन दाखवणार. आता राहुल गांधी स्वत:अस काही करुन दाखवता म्हटल्यावर आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही युवराजांच्या पाऊलावर पाऊल ठेवलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात पांगरी या छोट्या खेड्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचं बांधकाम सुरु आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांचे शिष्टमंडळ दाखल झाले.

भर उन्हात सर्व काम पाहुन झाल्यानंतर सर्व जण एका झाडाखाली थांबले आणि मग मुख्यमंत्र्यांनी तिथल्या मजुरांबरोबर सहभोजन केलं. त्यामुळे सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला. पंतप्रधान कार्यालयातून महाराष्ट्राची धुरा सांभाळण्यासाठी आले पृथ्वीराज चव्हाण चक्क मजुरांसोबत सहभोजन करताय पाहुन शिष्टमंडळ अवाक् झाले. आणि दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री आपल्यासोबत जेवण करताय म्हटल्यावर मजुरांना काय करावे काय नाही असं झालं होतं. मुख्यमंत्र्यांनी सहभोजन केलं यांची बातमी गावात वार्‍यासारखी पसरली अन् कोणाला विश्वास बसो याना बसो पण शेतकरी मजूर मोठ्या अभिमानाने सांगत होते...'म्या मुख्यमंत्र्यांसोबत जेवलो...'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2012 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close