S M L

राज ठाकरे यांच्यावरील वॉरंट रद्द

02 एप्रिलकल्याणमध्ये रेल्वेभरतीसाठी आलेल्या परप्रांतीय परीक्षाथीर्ंना मारहाणप्रकरणी राज ठाकरेंना दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांच्याविरुद्ध याप्रकरणी बजावण्यात आलेलं वॉरंट रद्द करण्यात आलंय. तर या खटल्यामधून कायमस्वरुपी बाहेर काढण्याचा अर्ज राज ठाकरे यांनी न्यायालयात सादर केला आहे. त्यावर पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. मात्र या सुनावणीला राज ठाकरेंना उपस्थित राहण्याची गरज नसेल. ऑक्टोबर 2008 मध्ये रेल्वे भरतीसाठी परिक्षा देण्यासाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर मारहाण केली होती. या प्रकरणात चिथावणी दिल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज साडेतीन वर्षानंतर या निकालाचा निर्णय देत राज ठाकरे यांच्यावरील वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2012 10:06 AM IST

राज ठाकरे यांच्यावरील वॉरंट रद्द

02 एप्रिल

कल्याणमध्ये रेल्वेभरतीसाठी आलेल्या परप्रांतीय परीक्षाथीर्ंना मारहाणप्रकरणी राज ठाकरेंना दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांच्याविरुद्ध याप्रकरणी बजावण्यात आलेलं वॉरंट रद्द करण्यात आलंय. तर या खटल्यामधून कायमस्वरुपी बाहेर काढण्याचा अर्ज राज ठाकरे यांनी न्यायालयात सादर केला आहे. त्यावर पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. मात्र या सुनावणीला राज ठाकरेंना उपस्थित राहण्याची गरज नसेल. ऑक्टोबर 2008 मध्ये रेल्वे भरतीसाठी परिक्षा देण्यासाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर मारहाण केली होती. या प्रकरणात चिथावणी दिल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज साडेतीन वर्षानंतर या निकालाचा निर्णय देत राज ठाकरे यांच्यावरील वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2012 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close