S M L

पुणे पालिकेत पाणीवाटपावरुन तू तू मैं मैं

02 एप्रिलमहापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुण्यात सुरू झालेल्या पाणीकपातीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापलंय. त्यातच जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिकेमध्ये पाणीवाटपावरून तू-तू- मै-मै रंगू लागल्याने वाढत्या उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. मार्चपासून पुण्यात 10 टक्के पाणी कपात लागू झालीय पण कोथरूडसारख्या अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे त्रासलेल्या नागरिकांच्या रोषाचा फटका लोकप्रतिनिधींना बसू लागल्याने कोथरूड परिसरातील आमदार आणि नगरसेवकांनी थेट अधिकार्‍यांसोबत नागरिकांचीच चर्चा घडवून आणली. सकाळी किंवा संध्याकाळी 2 तास पाणी पुरेशा दाबाने द्या अशी माफत मागणी नागरिकांनी मांडली. लोकप्रतिनिधींनी पाणीकपातीचं खापर प्रशासन आणि परतीचा पाऊस न होण्यावर फोडलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2012 10:43 AM IST

पुणे पालिकेत पाणीवाटपावरुन तू तू मैं मैं

02 एप्रिल

महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुण्यात सुरू झालेल्या पाणीकपातीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापलंय. त्यातच जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिकेमध्ये पाणीवाटपावरून तू-तू- मै-मै रंगू लागल्याने वाढत्या उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. मार्चपासून पुण्यात 10 टक्के पाणी कपात लागू झालीय पण कोथरूडसारख्या अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे त्रासलेल्या नागरिकांच्या रोषाचा फटका लोकप्रतिनिधींना बसू लागल्याने कोथरूड परिसरातील आमदार आणि नगरसेवकांनी थेट अधिकार्‍यांसोबत नागरिकांचीच चर्चा घडवून आणली. सकाळी किंवा संध्याकाळी 2 तास पाणी पुरेशा दाबाने द्या अशी माफत मागणी नागरिकांनी मांडली. लोकप्रतिनिधींनी पाणीकपातीचं खापर प्रशासन आणि परतीचा पाऊस न होण्यावर फोडलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2012 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close