S M L

वाळू माफियाच्या निषेधार्थ महसूल कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

02 एप्रिलरायगड जिल्ह्यात वाळूमाफियांचा धुमाकूळ सुरू आहे. आज तर रोह्यामध्ये अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करणार्‍या तहसिलदार गणेश सांगळे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष नितिन परब यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सांगळे यांनी केला. रोहा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय. दरम्यान, राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष नितिन परबना निलंबित करण्याची सुनील तटकरेंनी घोषणा केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2012 12:45 PM IST

वाळू माफियाच्या निषेधार्थ महसूल कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

02 एप्रिल

रायगड जिल्ह्यात वाळूमाफियांचा धुमाकूळ सुरू आहे. आज तर रोह्यामध्ये अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करणार्‍या तहसिलदार गणेश सांगळे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष नितिन परब यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सांगळे यांनी केला. रोहा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय. दरम्यान, राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष नितिन परबना निलंबित करण्याची सुनील तटकरेंनी घोषणा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2012 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close