S M L

चांद्रमोहिमेवरील कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

23 नोव्हेंबर, दिल्ली पल्लवी पॉलभारतानं यशस्वी करुन दाखवलेल्या चांद्रयान मोहिमेतून संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे पण 3 अब्ज 86 कोटी रुपये खर्चून ही मोहीम राबवणं गरजेचं होतं का, असा सवालही आता विचारला जाऊ लागला आहे.भारताची लोकसंख्या एक अब्जाच्यावर आहे. त्यातल्या निम्म्या लोकसंख्येचं सरासरी दरडोई उत्पन्न फक्त 18 रूपये. यातून एकवेळचं जेवण खरेदी करणंही शक्य नाही. मात्र चांद्रमोहीमेवर 3 अब्ज 86 कोटी रूपये खर्च करण्यात आलाय. हा खर्च योग्य आहे का ? आतापर्यंत जगभरातून 67 वेळा चांद्रमोहीम राबवण्यात आली. चंद्रावर माणूसही पोहोचला आहे. तिथले बरेच फोटो आणि काही सँपल्सही मिळालेत. मग पुन्हा ही मोहीम कशासाठी ? ' शास्रीयदृष्ट्या ही मोहीम महत्त्वाची आहे की नाही हे मी सांगू शकत नाही ' असं सायन्स प्रोफेसर एच. एस.मुकुंद यांनी सांगितलं. ही चांद्रयान मोहीम आतापर्यंतची सर्वात कमी खर्चाची मोहीम आहे. एका बोईंग विमानापेक्षा कमी आहे. आयपीएलचा टेलिकास्ट राईटसाठी यापेक्षा दहापट जास्त पैसे लागलेत आणि हा खर्च इस्रोच्या वार्षिक बजेटच्या फक्त चार टक्के आहे. पण इतक्या स्वस्तात ही मोहीम करुनही त्याचे उपयोग मोठे आहेत. पूर्ण चंद्राचा थ्री डायमेन्शनल मॅप मिळेल. चंद्राच्या पृष्ठभागावरील प्रत्येक गोष्टीचा एक्स- रे मिळेल. शुद्ध पाण्याची उपलब्धता कळेल. माणूस तिथे राहू शकेल की नाही ? याविषयी माहिती मिळेल आणि आपल्यासमोरचा ऊर्जेचा प्रश्नही सुटण्याची शक्यता आहे. ' चंद्रावरती असलेलं हेलियम थ्री आपल्याला वर्षानुवर्ष ऊर्जा पुरवत राहील ' , असं इस्रोचे चेअरमन डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी सांगितलं. स्पेस लाँचिंगपोटी मिळणार्‍या भाड्यातून भारताला गेल्यावर्षी 900 कोटी रुपये मिळवलेत. त्याशिवाय गेल्या दोन वर्षात 16 फॉरेन सॅटेलाईट सोडूनही आपण बराच पैसा मिळवलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2008 01:17 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2008 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close