S M L

नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या गैरकारभाराचा पर्दाफाश

दीप्ती राऊत, नाशिक03 एप्रिलकॅन्टीनसाठीच्या पुरवठ्याची वादग्रस्त टेंडर्स, विशेष कैद्यांना फाईव्ह स्टार ट्रीटमेंट आणि हॉस्पिटलायझेशनसाठी थेट पैशाची मागणी. नाशिकरोड जेलचे अधिक्षक शामकांत पवार यांच्या विरोधातल्या या तक्रारी आहेत. पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत या तक्रारी पोहोचूनही याची साधी चौकशीही झाली नाही अशा अनेक कारनाम्यानी भरले आहे नाशिकचे सेंट्रल जेल..नाशिक रोड सेंट्रल जेल...इथल्या कुख्यात कैद्यांइतकंच अनेक गैरप्रकारांबद्दल हे जेल कुप्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा इथल्या गैरकारभाराचा नमुना पुढे आलाय तो कॅन्टीनच्या निविदांबाबत. कॅन्टीनला साहित्य पुरवण्याच्या निविदेची जाहिरात तर प्रसिद्ध झाली. पण, फॉर्म मात्र काही खास व्यक्तींनाच मिळाले.तक्रारदार सुभाष वाणी म्हणतात, मी 1975 पासून माल देतो, पण मला फॉर्म देण्यास टाळाटाळ केली. तर निकाहत शेख म्हणतातस मला दोन तास बसवून ठेवलं, अधिक्षकही भेटले नाहीत आणि फॉर्मही दिले नाहीत. जेलच्या कॅन्टीनसाठी महिनाभराच्या मालाच्या पुरवठ्याचे होतात, साधारण 10 लाख रुपये. यासाठीचा ठेकेदार नियमानुसार निवडावा ही अधिक्षकांची जबाबदारी. पण प्रत्यक्षात मात्र घडतं वेगळंच.तक्रारदार विजय भालेराव म्हणतात, निविदा पारदर्शी पद्धतीने आणि शासनाच्या नियमांनुसार झाल्या नाहीत. आम्ही जाब विचारण्याचा, तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर मलाच दमदाटी झाली.जेलमध्ये माल पुरवण्याच्या निविदा राबवण्याचे नियम सांगायला अधिक्षकांनी नकार दिला. नाशिक रोड जेलमधल्या या गैरप्रकारांबद्दल अधिक्षक शामकांत पवार यांना विचारलं असता त्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्यास नकार दिला. निविदेच्या गैरप्रकाराबद्दल जबाबदारीचा चेंडू त्यांनी डीआयजी औरंगाबाद यांच्या कोर्टात टाकला. त्यांच्या विरोधातल्या तक्रारी थेट पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यात. पण कारवाई कोणीच करत नाही.मालाच्या ठेक्यातल्या या गैरप्रकारासोबतच अधिक्षक शामकांत पवार यांच्या विरोधात इतरही अनेक गंभीर तक्रारी दाखल झाल्यात.* खास कैद्यांना खास वागणूक* आजारी कैद्यांकडून पैशाची मागणी* कैद्यांच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट अन्नकैद्यांच्या मनाप्रमाणे वागलं नाही की तक्रारी केल्या जातात असं अधिक्षकांचं म्हणणं आहे. पण त्या तक्रारींची ना चौकशी होते ना कोणती कारवाई. जेलच्या अभेद्य भिंतींआड हा गैरकारभारही दबून राहतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 3, 2012 10:18 AM IST

नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या गैरकारभाराचा पर्दाफाश

दीप्ती राऊत, नाशिक

03 एप्रिल

कॅन्टीनसाठीच्या पुरवठ्याची वादग्रस्त टेंडर्स, विशेष कैद्यांना फाईव्ह स्टार ट्रीटमेंट आणि हॉस्पिटलायझेशनसाठी थेट पैशाची मागणी. नाशिकरोड जेलचे अधिक्षक शामकांत पवार यांच्या विरोधातल्या या तक्रारी आहेत. पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत या तक्रारी पोहोचूनही याची साधी चौकशीही झाली नाही अशा अनेक कारनाम्यानी भरले आहे नाशिकचे सेंट्रल जेल..

नाशिक रोड सेंट्रल जेल...इथल्या कुख्यात कैद्यांइतकंच अनेक गैरप्रकारांबद्दल हे जेल कुप्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा इथल्या गैरकारभाराचा नमुना पुढे आलाय तो कॅन्टीनच्या निविदांबाबत. कॅन्टीनला साहित्य पुरवण्याच्या निविदेची जाहिरात तर प्रसिद्ध झाली. पण, फॉर्म मात्र काही खास व्यक्तींनाच मिळाले.

तक्रारदार सुभाष वाणी म्हणतात, मी 1975 पासून माल देतो, पण मला फॉर्म देण्यास टाळाटाळ केली. तर निकाहत शेख म्हणतातस मला दोन तास बसवून ठेवलं, अधिक्षकही भेटले नाहीत आणि फॉर्मही दिले नाहीत. जेलच्या कॅन्टीनसाठी महिनाभराच्या मालाच्या पुरवठ्याचे होतात, साधारण 10 लाख रुपये. यासाठीचा ठेकेदार नियमानुसार निवडावा ही अधिक्षकांची जबाबदारी. पण प्रत्यक्षात मात्र घडतं वेगळंच.तक्रारदार विजय भालेराव म्हणतात, निविदा पारदर्शी पद्धतीने आणि शासनाच्या नियमांनुसार झाल्या नाहीत. आम्ही जाब विचारण्याचा, तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर मलाच दमदाटी झाली.

जेलमध्ये माल पुरवण्याच्या निविदा राबवण्याचे नियम सांगायला अधिक्षकांनी नकार दिला. नाशिक रोड जेलमधल्या या गैरप्रकारांबद्दल अधिक्षक शामकांत पवार यांना विचारलं असता त्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्यास नकार दिला. निविदेच्या गैरप्रकाराबद्दल जबाबदारीचा चेंडू त्यांनी डीआयजी औरंगाबाद यांच्या कोर्टात टाकला. त्यांच्या विरोधातल्या तक्रारी थेट पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यात. पण कारवाई कोणीच करत नाही.

मालाच्या ठेक्यातल्या या गैरप्रकारासोबतच अधिक्षक शामकांत पवार यांच्या विरोधात इतरही अनेक गंभीर तक्रारी दाखल झाल्यात.

* खास कैद्यांना खास वागणूक* आजारी कैद्यांकडून पैशाची मागणी* कैद्यांच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट अन्न

कैद्यांच्या मनाप्रमाणे वागलं नाही की तक्रारी केल्या जातात असं अधिक्षकांचं म्हणणं आहे. पण त्या तक्रारींची ना चौकशी होते ना कोणती कारवाई. जेलच्या अभेद्य भिंतींआड हा गैरकारभारही दबून राहतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2012 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close