S M L

सचिननं सोडलं मुंबई इंडियन्सचं कॅप्टनपद

02 एप्रिलआयपीएलच्या 5 व्या हंगामाला दोनच दिवस बाकी असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्रांतीचं कारण देत मुंबई इंडियन्सच कर्णधारपद सोडलं आहे. यामुळे आता हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचा कर्णधारपद साभाळणार आहे. सचिन टाचेच्या दुखण्यामुळे लंडनला रवाना झाला तेंव्हाच सचिन आयपीएलमध्ये खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने सचिन आयपीएलमध्ये खेळणार असं स्पष्ट केलं. मात्र आता सचिनने विश्रांतीच कारण देत कर्णधारपद सोडून दिलं आहे पण आपण आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे असंही सचिनने स्पष्ट केलं. हरभजननं सचिनच्या अनुपस्थितीत याआधीही मंुबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. पण हरभजनची कॅप्टनपद वादात अडकलं होतं. हरभजनने मैदानावरच श्रीसंतच्या कानफटात लगावली होती. तेव्हाही या मॅचमध्ये हरभजनचं कॅप्टन होता. त्यामुळे आता यंदाच्या सीझनमध्ये भज्जीकडून कोणती 'फटकेबाजी' पाह्याला मिळणार हे पाहण्यासारखे ठरले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2012 01:50 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2012 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close