S M L

26/11 चा मास्टरमाईंड हाफीज सईदवर 51 कोटींचे बक्षीस

03 एप्रिलमुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज मोहम्मद सईद याच्यावर अमेरिकेनं 51 कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्याच्यासोबतच लष्करचा सहसंस्थापक आणि सईदचा मेहुणा अब्दुल रेहमान मक्की याच्यावरही 30 लाख डॉलर्सचे बक्षीस लावण्यात आलं आहे. हाफीजवरच्या बक्षिसाचे भारताने स्वागत केलंय. आता तरी पाकिस्तान हाफीजवर कारवाई करेल, अशी अपेक्षा गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे. हाफीज सईद हा पाकिस्तानात जाहीर सभा घेतो. त्याचा ठावठिकाणाही पाकिस्तान सरकारला माहीत आहे. तरीही पाकिस्तान त्याच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप चिदंबरम यांनी पुन्हा एकदा केलाय. पाकिस्तानकडे हाफीजच्या आवाजाच्या नमुन्याची मागणी भारताने केलीय. पण, ते द्यायला पाकिस्तान टाळाटाळ करत असल्याचंही चिदंबरम यांनी म्हटलंय.हाफीजवरचे आरोप - 26/11चा हल्ल्याचा मास्टरमाईंड- 26/11 च्या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू- हाफीजने भारत, अमेरिकेविरुद्ध जिहाद पुकारला- लष्कर-ए-तोएबा आणि जमात-उद-दावा या अतिरेकी संघटनांची स्थापना- अफगाणिस्तानातल्या अतिरेक्यांना पाठिंबा अमेरिकेनं हाफीजवर जवळपास 51 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलं असलं, तरी अमेरिकेच्या या कारवाईवर काही प्रश्न उपस्थित होतात.आताच कारवाई का ?- हाफीजबद्दल आधीपासूनच माहिती असूनही अमेरिकेनं आताच हे पाऊल का उचललं ?- हाफीज जाहीर सभा घेतो, मग त्याला पकडण्यासाठी बक्षीस घोषित करण्याची काय गरज होती ?- पाकबरोबरच्या चर्चेत पाकवर दबाव आणण्याचा हा अमेरिकेचा प्रयत्न आहे का ?

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 3, 2012 11:29 AM IST

26/11 चा मास्टरमाईंड हाफीज सईदवर 51 कोटींचे बक्षीस

03 एप्रिल

मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज मोहम्मद सईद याच्यावर अमेरिकेनं 51 कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्याच्यासोबतच लष्करचा सहसंस्थापक आणि सईदचा मेहुणा अब्दुल रेहमान मक्की याच्यावरही 30 लाख डॉलर्सचे बक्षीस लावण्यात आलं आहे. हाफीजवरच्या बक्षिसाचे भारताने स्वागत केलंय. आता तरी पाकिस्तान हाफीजवर कारवाई करेल, अशी अपेक्षा गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे. हाफीज सईद हा पाकिस्तानात जाहीर सभा घेतो. त्याचा ठावठिकाणाही पाकिस्तान सरकारला माहीत आहे. तरीही पाकिस्तान त्याच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप चिदंबरम यांनी पुन्हा एकदा केलाय. पाकिस्तानकडे हाफीजच्या आवाजाच्या नमुन्याची मागणी भारताने केलीय. पण, ते द्यायला पाकिस्तान टाळाटाळ करत असल्याचंही चिदंबरम यांनी म्हटलंय.

हाफीजवरचे आरोप

- 26/11चा हल्ल्याचा मास्टरमाईंड- 26/11 च्या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू- हाफीजने भारत, अमेरिकेविरुद्ध जिहाद पुकारला- लष्कर-ए-तोएबा आणि जमात-उद-दावा या अतिरेकी संघटनांची स्थापना- अफगाणिस्तानातल्या अतिरेक्यांना पाठिंबा

अमेरिकेनं हाफीजवर जवळपास 51 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलं असलं, तरी अमेरिकेच्या या कारवाईवर काही प्रश्न उपस्थित होतात.

आताच कारवाई का ?

- हाफीजबद्दल आधीपासूनच माहिती असूनही अमेरिकेनं आताच हे पाऊल का उचललं ?- हाफीज जाहीर सभा घेतो, मग त्याला पकडण्यासाठी बक्षीस घोषित करण्याची काय गरज होती ?- पाकबरोबरच्या चर्चेत पाकवर दबाव आणण्याचा हा अमेरिकेचा प्रयत्न आहे का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2012 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close