S M L

क.डों.पा.च्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मल्लेश शेट्टी

03 एप्रिलकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी विजयी झाले आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या छुप्या पाठिंब्याने शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहिली तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने शिवसेनेचा या निवडणुकीतला मार्ग मोकळा झाला. दरम्यान, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकी पार होऊन देखील अजुनपर्यंत स्थायी समिती सदस्यांची निवड झाली नाही. यामुळे महापालिकेच्या खजिन्याची चावी असणार्‍या स्थायी समिती सभापतीपदाची निवड लांबणीवर पडली आहे. महापौरपद शिवसेनेकडे गेले. मात्र स्थायी समिती आपल्याकडे राहावी यासाठी आघाडी आणि युती जोरदार प्रयत्न करताय. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीला अत्यंत गांभिर्यानी घेतलं आहे. एकूणच स्थायी समिती एवढी महत्त्वाची का आहे ? - स्थायी समिती सगळे आर्थिक प्रस्ताव मंजूर करते- मुंबई महापालिकेचे 25 हजार कोटी रुपये कोणत्या कामासाठी वापरायचे हे ठरवायचे सर्वाधिकार स्थायी समितीच्या सभापतीला- ज्या अपक्षांनी सत्ता स्थापनेत सहकार्य केलं, ते स्थायी समितीचे सदस्यत्व मागतात- मुंबई अखिल भारतीय सेनेच्या 2 नगरसेवकांनी सेनेला पाठिंबा दिला; त्या बदल्यात गीता गवळी स्टॅडिंग कमिटीच्या सदस्या झाल्या- साधारणतः प्रस्ताव मंजूर केल्यानंतर प्रत्येक टेंडरमागे 2 टक्के किमान कमिशन सदस्यांना देण्याचा अलिखित नियम असतो

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 3, 2012 02:35 PM IST

क.डों.पा.च्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मल्लेश शेट्टी

03 एप्रिल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी विजयी झाले आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या छुप्या पाठिंब्याने शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहिली तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने शिवसेनेचा या निवडणुकीतला मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकी पार होऊन देखील अजुनपर्यंत स्थायी समिती सदस्यांची निवड झाली नाही. यामुळे महापालिकेच्या खजिन्याची चावी असणार्‍या स्थायी समिती सभापतीपदाची निवड लांबणीवर पडली आहे. महापौरपद शिवसेनेकडे गेले. मात्र स्थायी समिती आपल्याकडे राहावी यासाठी आघाडी आणि युती जोरदार प्रयत्न करताय. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीला अत्यंत गांभिर्यानी घेतलं आहे.

एकूणच स्थायी समिती एवढी महत्त्वाची का आहे ?

- स्थायी समिती सगळे आर्थिक प्रस्ताव मंजूर करते- मुंबई महापालिकेचे 25 हजार कोटी रुपये कोणत्या कामासाठी वापरायचे हे ठरवायचे सर्वाधिकार स्थायी समितीच्या सभापतीला- ज्या अपक्षांनी सत्ता स्थापनेत सहकार्य केलं, ते स्थायी समितीचे सदस्यत्व मागतात- मुंबई अखिल भारतीय सेनेच्या 2 नगरसेवकांनी सेनेला पाठिंबा दिला; त्या बदल्यात गीता गवळी स्टॅडिंग कमिटीच्या सदस्या झाल्या- साधारणतः प्रस्ताव मंजूर केल्यानंतर प्रत्येक टेंडरमागे 2 टक्के किमान कमिशन सदस्यांना देण्याचा अलिखित नियम असतो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2012 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close