S M L

घर झाले भारी, वारसदार अडला दारी !

अद्वैत मेहता, पुणे 04 एप्रिलपुण्यात जमिनींचे भाव गगनाला भिडलेत आणि त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीचे वाद वाढत आहे. तर दुसरीकडे, 20-25 वर्षापूर्वी झालेल्या जमीन व्यवहारांना आता हरकत घेतली जातेय. आणि न्यायालयीन खटले दाखल होत आहे. जमिनींच्या या सगळ्या वादात,धमक्या देऊन जमिनी बळकावण्याचे किंवा पैसे उकळण्याचे डाव उजेडात येत आहे. पुण्यातल्या बाणेर बालेवाडी भागातील प्रथमेश सोसायटीचे रहिवासी गेले काही दिवस हाच अनुभव घेत आहे. पुण्यातील बाणेर भागातील बालेवाडी फाटा परिसरात 1994-95 साली बाळ डेवलपर्सनी ताम्हाणे यांच्याकडून जमीन विकत घेवून बंगल्यांकरता प्लॉट्स पाडले. या प्लॉट्सवर अनेकजणांनी अलिशान बंगले बांधले पण गेले काही दिवस संदीप ताम्हाणे या जमीन मालकाच्या वारसदाराने आपल्या वडलांनी केलेल्या व्यवहारात त्रुटी असल्याचं सांगत बाळ डेव्हलपर्स आणि प्लॉट धारकांविरोधात न्यायालयात केस दाखल केली. अचानकपणे 20 -25 वर्षानंतर हा वाद सुरू झाल्याने या बंगल्यांमध्ये राहायला आलेल्या रहिवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. संदीप ताम्हाणे यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत. तर दुसरीकडे ताम्हाणे है पैशाच्या लोभानं असं वागत असल्याचं बाळ डेव्हलपर्सनी म्हटलं आहे. पुणे पोलीस आणि पुणे महापालिका मात्र या सगळ्या घटनांकडे न्यायालयीन लढाई म्हणून दुर्लक्ष करत आहे. सुसंकृत शहर या पुण्याच्या नावलौकीकाला जमिनींच्या वाढत्या गैरव्यवहारांमुळं बट्टा लागतोय हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2012 05:29 PM IST

घर झाले भारी, वारसदार अडला दारी !

अद्वैत मेहता, पुणे

04 एप्रिल

पुण्यात जमिनींचे भाव गगनाला भिडलेत आणि त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीचे वाद वाढत आहे. तर दुसरीकडे, 20-25 वर्षापूर्वी झालेल्या जमीन व्यवहारांना आता हरकत घेतली जातेय. आणि न्यायालयीन खटले दाखल होत आहे. जमिनींच्या या सगळ्या वादात,धमक्या देऊन जमिनी बळकावण्याचे किंवा पैसे उकळण्याचे डाव उजेडात येत आहे. पुण्यातल्या बाणेर बालेवाडी भागातील प्रथमेश सोसायटीचे रहिवासी गेले काही दिवस हाच अनुभव घेत आहे.

पुण्यातील बाणेर भागातील बालेवाडी फाटा परिसरात 1994-95 साली बाळ डेवलपर्सनी ताम्हाणे यांच्याकडून जमीन विकत घेवून बंगल्यांकरता प्लॉट्स पाडले. या प्लॉट्सवर अनेकजणांनी अलिशान बंगले बांधले पण गेले काही दिवस संदीप ताम्हाणे या जमीन मालकाच्या वारसदाराने आपल्या वडलांनी केलेल्या व्यवहारात त्रुटी असल्याचं सांगत बाळ डेव्हलपर्स आणि प्लॉट धारकांविरोधात न्यायालयात केस दाखल केली. अचानकपणे 20 -25 वर्षानंतर हा वाद सुरू झाल्याने या बंगल्यांमध्ये राहायला आलेल्या रहिवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतंय.

संदीप ताम्हाणे यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत. तर दुसरीकडे ताम्हाणे है पैशाच्या लोभानं असं वागत असल्याचं बाळ डेव्हलपर्सनी म्हटलं आहे. पुणे पोलीस आणि पुणे महापालिका मात्र या सगळ्या घटनांकडे न्यायालयीन लढाई म्हणून दुर्लक्ष करत आहे. सुसंकृत शहर या पुण्याच्या नावलौकीकाला जमिनींच्या वाढत्या गैरव्यवहारांमुळं बट्टा लागतोय हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2012 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close