S M L

अशा बातम्या धोकायदाक - पंतप्रधान

04 एप्रिललष्करी तुकड्या दिल्लीकडे निघाल्या होत्या या बातमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारची बातमी धोकायदाक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, सरकार आणि लष्करातले संबंध सध्या अतिशय कमकुवत झाल्याची टीका विरोधकांनी केली.लष्करी तुकड्या दिल्लीकडे निघाल्या होत्या या वृत्तामुळे एकच वादळ उठलं. सरकारने लगेच स्पष्टीकरण देत सारवासारव केली. पण या सर्व प्रकारामुळे सरकार आणि लष्कर यांच्यावरची विश्वासार्हता कमी होतेय का ?, घटनात्मक संस्थांचा सरकारला आदरच राहिला नाही का आणि तसं असेल तर सरकार यासंबंधी काय पावलं उचलणार आहे, हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. काहीही झालं तरी मौनच बाळगणार्‍या पंतप्रधानांना या घटनेनंतर मात्र स्पष्टीकरण द्यावं लागलं. पंतप्रधानांचं स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलंय. या बातम्या भीती पसरवणार्‍या आहेत. त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. लष्करप्रमुख हे प्रतिष्ठित पद आहे. त्याला धक्का पोहोचू न देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचा आदर राखलाच पाहिजे.सरकार आणि लष्करामधला हा वाद म्हणजे विरोधकांना आयतीच संधी मिळाली आणि त्यांनी कॅग, निवडणूक आयोग असे जुने वाद काढत सरकारवर टीकास्त्र सोडलं. लष्करप्रमुखांच्या वयाचा वाद, भ्रष्टाचाराची प्रकरणं यामुळे कडक शिस्त ही ओळख असलेलं लष्करही गेल्या काही महिन्यात चांगलंच वादात सापडलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2012 06:00 PM IST

अशा बातम्या धोकायदाक - पंतप्रधान

04 एप्रिल

लष्करी तुकड्या दिल्लीकडे निघाल्या होत्या या बातमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारची बातमी धोकायदाक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, सरकार आणि लष्करातले संबंध सध्या अतिशय कमकुवत झाल्याची टीका विरोधकांनी केली.

लष्करी तुकड्या दिल्लीकडे निघाल्या होत्या या वृत्तामुळे एकच वादळ उठलं. सरकारने लगेच स्पष्टीकरण देत सारवासारव केली. पण या सर्व प्रकारामुळे सरकार आणि लष्कर यांच्यावरची विश्वासार्हता कमी होतेय का ?, घटनात्मक संस्थांचा सरकारला आदरच राहिला नाही का आणि तसं असेल तर सरकार यासंबंधी काय पावलं उचलणार आहे, हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. काहीही झालं तरी मौनच बाळगणार्‍या पंतप्रधानांना या घटनेनंतर मात्र स्पष्टीकरण द्यावं लागलं.

पंतप्रधानांचं स्पष्टीकरण

संरक्षण मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलंय. या बातम्या भीती पसरवणार्‍या आहेत. त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. लष्करप्रमुख हे प्रतिष्ठित पद आहे. त्याला धक्का पोहोचू न देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचा आदर राखलाच पाहिजे.

सरकार आणि लष्करामधला हा वाद म्हणजे विरोधकांना आयतीच संधी मिळाली आणि त्यांनी कॅग, निवडणूक आयोग असे जुने वाद काढत सरकारवर टीकास्त्र सोडलं. लष्करप्रमुखांच्या वयाचा वाद, भ्रष्टाचाराची प्रकरणं यामुळे कडक शिस्त ही ओळख असलेलं लष्करही गेल्या काही महिन्यात चांगलंच वादात सापडलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2012 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close