S M L

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला - शरद पवार

05 एप्रिलराष्ट्रवादीचे नेत आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आज घुमजाव केलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं त्यांनी आज म्हटलं आहे. ही तर सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची वेळ आहे, असंही पवार म्हणाले. आज शरद पवार हे सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्‍यावर आहेत. वरुड आणि खडकी गावात होत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांची ते पाहणी करणार आहेत. वडूज इथल्या पाणीटंचाईबाबतही ते एका बैठकीत ते मार्गदर्शनही करणार आहेत. काल बुधवारी शरद पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यपाल के शंकरनारायणन यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी सातार्‍यात दुष्काळी भागाचा दौरा करताना खरडा, भाकरी खालली होती. त्यावर शरद पवारांनी म्हटलंय की, खरडा आणि भाकरी खावून दुष्काळी भागाचे प्रश्न सुटत नाही. पवार इथेच थांबले नाहीत तर त्यांनी राज्यपालांवरही जोरदार टीका केली. राज्यपालांनी दुष्काळी भागाचा दौरा करावा. निधीसाठी फक्त विनंती करण्यापेक्षा शंकरनारायणन यांनी राजभवनातून बाहेर पडावे पण त्यांना बाहेर पडण्याची इच्छाचं दिसत नाही, अशी कडक टीका पवारांनी केली. मात्र आज पवारांनी स्पष्टीकरण देत माझ्या विधानाचे विपर्यास केला गेला असा घुमजाव केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2012 09:29 AM IST

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला - शरद पवार

05 एप्रिल

राष्ट्रवादीचे नेत आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आज घुमजाव केलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं त्यांनी आज म्हटलं आहे. ही तर सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची वेळ आहे, असंही पवार म्हणाले. आज शरद पवार हे सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्‍यावर आहेत. वरुड आणि खडकी गावात होत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांची ते पाहणी करणार आहेत. वडूज इथल्या पाणीटंचाईबाबतही ते एका बैठकीत ते मार्गदर्शनही करणार आहेत.

काल बुधवारी शरद पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यपाल के शंकरनारायणन यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी सातार्‍यात दुष्काळी भागाचा दौरा करताना खरडा, भाकरी खालली होती. त्यावर शरद पवारांनी म्हटलंय की, खरडा आणि भाकरी खावून दुष्काळी भागाचे प्रश्न सुटत नाही. पवार इथेच थांबले नाहीत तर त्यांनी राज्यपालांवरही जोरदार टीका केली. राज्यपालांनी दुष्काळी भागाचा दौरा करावा. निधीसाठी फक्त विनंती करण्यापेक्षा शंकरनारायणन यांनी राजभवनातून बाहेर पडावे पण त्यांना बाहेर पडण्याची इच्छाचं दिसत नाही, अशी कडक टीका पवारांनी केली. मात्र आज पवारांनी स्पष्टीकरण देत माझ्या विधानाचे विपर्यास केला गेला असा घुमजाव केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2012 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close