S M L

रविंद्र केळेकरांना ज्ञानपीठ जाहीर

23 नोव्हेंबर, पणजीसाहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार गोमंतकीय साहित्यिक आणि गांधीवादी विचारवंत रविंद्र केळेकर यांना जाहीर करण्यात आलाय. 2006 साठीचा हा पुरस्कार कोकणी साहित्यिकाला पहिल्यांदाच दिला जात आहे. केळेकर यांच्या रूपाने कोकणीला आणि गोव्याला सर्वाेच्च सन्मान मिळाला आहे. दक्षिण गोव्यातल्या कुंकळींम या गावात 7 मार्च 1925 ला रविंद्र केळेकर यांचा जन्म झाला. गांधीवादी विचारसरणीच्या केळेकर यांनी आपलं सारं आयुष्य कोकणी भाषेच्या विकासासाठी वेचलं.' हिमालयान् ' या त्यांच्या कोकणीतल्या पुस्तकाला 1976 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. केळेकरांनी कोकणीत 100 हून अधिक पुस्तकं लिहिलीत. नवी शाऴा, हिमालयान्, बहुभाषिक भारतान् भाषेचे समाजशास्त्र, सत्याग्रह, मंगल प्रभात, महात्मा, कथा आणि कानयो, तुळशी, वेलिंवयल्यो घुल्यो, भज गोविंदम्, उजवाडाचे सूर, मुक्ती, तीन एके तीन, लाला बाला, ब्रह्मांडातले तांडव, पांथस्थ, समिधा, वोथांबे, सर्जकांची अंतरकथा ही त्यांची कोकणींतली गाजलेली पुस्तकं. ' जाग ' मासिकाचंही त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ संपादन केलं. शिवाय महाभारताचे दोन खंडही त्यांनी कोकणीत भाषांतरीत केलेत. त्यांनी मराठीतूनही विपुल साहित्यलेखन केलंय. ' जपान कसा दिसला ', ' गांधीजींच्या सहवासात ' ही त्यांची मराठीतली गाजलेली पुस्तकं. तसंच त्यांनी हिंदीतही लिखाण केलंय. त्यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी तसंच उत्तर भारतीय भाषांमध्येही अनुवाद झालेत. त्यांना यावर्षी 26 जानेवारीला साहित्य अकादमीची फेलोशिप आणि पद्मभूषण देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना मिळालेलं ज्ञानपीठ हे खर्‍या अर्थानं कोकणी भाषेला मिळालेला सन्मान आहे. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि काकासाहेब कालेलकरांचे पट्टशिष्य मानले जाणारे केळेकर हे लढाऊ लेखक आहेत. साहित्य अकादमीसोबत त्यांना गोवा कला अकादमी आणि सौहार्द सन्मान या पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक सत्यव्रत शास्त्री यांच्यासह त्यांना 2006 चा ज्ञानपीठ पुरस्कार संयुक्तपणे जाहीर झालाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2008 02:53 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2008 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close