S M L

सराफांच्या संपाचा कामगारांना फटका

प्रशांत कोरटकर, नागपूर05 एप्रिलकेंद्र सरकारने कच्च्या सोन्यावर 2% एक्साईज ड्युटी लावल्याचा निषेधार्थ गेल्या 17 दिवसापासून सराफ व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद केला. याचा फटका सोन्याचांदीचे दागिने तयार करणार्‍या कामगारांना बसला आहे. नागपूरच्या सराफा बाजारात रोजंदारीचं काम करणारा गणेश सोन्याचं प्लेटिंग करून दिवसाला 400 रू. कमवतो. पण सराफा व्यापारांच्या बंदमुळे त्यांचा रोजगार बंद झाला. याआधी केवळ ब्रँडेड ज्वेलरीवर 1 टक्का अबकारी कर आकारला जायचा पण, या बजेटमध्ये सोनंचांदीचे दागिने तयार करणार्‍या सराफा व्यवसायावरही सरकारने 2% सराफा एक्साइज आकारला.नागपूरमध्ये 3 हजाराच्या सोन्याचांदीची दुकानं आहेत. त्यात 25 हजाराच्या जवळपास कामगार काम करतात. या बंदचा फटका संपूर्ण कामगारांच्या कुटुंबाला बसतोय. याबाबत सराफा असोसिएशनने सरकार विरोधात आंदोलनही केलं आहे. सरकार आणि व्यापारी संघटनांमधल्या चर्चेत याबाबत तडजोड होऊ शकली नाही तर कारागिरांचं नुकसान होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2012 10:37 AM IST

सराफांच्या संपाचा कामगारांना फटका

प्रशांत कोरटकर, नागपूर

05 एप्रिल

केंद्र सरकारने कच्च्या सोन्यावर 2% एक्साईज ड्युटी लावल्याचा निषेधार्थ गेल्या 17 दिवसापासून सराफ व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद केला. याचा फटका सोन्याचांदीचे दागिने तयार करणार्‍या कामगारांना बसला आहे. नागपूरच्या सराफा बाजारात रोजंदारीचं काम करणारा गणेश सोन्याचं प्लेटिंग करून दिवसाला 400 रू. कमवतो. पण सराफा व्यापारांच्या बंदमुळे त्यांचा रोजगार बंद झाला. याआधी केवळ ब्रँडेड ज्वेलरीवर 1 टक्का अबकारी कर आकारला जायचा पण, या बजेटमध्ये सोनंचांदीचे दागिने तयार करणार्‍या सराफा व्यवसायावरही सरकारने 2% सराफा एक्साइज आकारला.

नागपूरमध्ये 3 हजाराच्या सोन्याचांदीची दुकानं आहेत. त्यात 25 हजाराच्या जवळपास कामगार काम करतात. या बंदचा फटका संपूर्ण कामगारांच्या कुटुंबाला बसतोय. याबाबत सराफा असोसिएशनने सरकार विरोधात आंदोलनही केलं आहे. सरकार आणि व्यापारी संघटनांमधल्या चर्चेत याबाबत तडजोड होऊ शकली नाही तर कारागिरांचं नुकसान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2012 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close