S M L

छगन भुजबळांवर कॅगचा ठपका

07 एप्रिलविधानसभेत कॅगचा अहवाल फुटीने राज्याला एकच हादरा बसला. सत्ताधारी मंत्र्यांच्या अनेक नातेवाईकांची नावं कॅगच्या अहवालात असल्याने विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. 10 मंत्र्यांच्या नातेवाईकांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला. भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप केला. या अहवालात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. भुजबळ यांचे सुपुत्र समिर भुजबळांना 9.39 कोटींची जागा 9 लाखात देण्यात आली. गोण खनिजांसाठीची राखीव 50 हजार स्क्वेअर मीटर जमीन इंजिनियरिंग कॉलेजला देण्यात आली. तर 2009 मध्ये भुजबळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेचसार्वजनिक बांधकाम खात्याची जमीन आपल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला कवडीमोल भावानं विकल्याचा ठपक भुजबळ यांच्यावर कॅगच्या रिपोर्टमध्ये ठेवण्यात आला. नाशिकच्या गोवर्धनमधल्या या भूखंडाच्या व्यवहार ?- पीडब्लूडी (PWD)च्या जमिनीचा एमईटीला ताबा- सात हेक्टर जमिनीचा ताबा- 23 डिसेंबर 2003- 4 हेक्टर 13 आर क्षेत्राचा ताबा- 1 लाख 54 हजार 875 रुपये सरकारी तिजोरीत भरले17 फेब्रुवारी 2009- 5 हेक्टर क्षेत्राचा ताबा- 7 लाख 53 हजार 250 रुपये सरकारी तिजोरीत भरले

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2012 11:05 AM IST

छगन भुजबळांवर कॅगचा ठपका

07 एप्रिल

विधानसभेत कॅगचा अहवाल फुटीने राज्याला एकच हादरा बसला. सत्ताधारी मंत्र्यांच्या अनेक नातेवाईकांची नावं कॅगच्या अहवालात असल्याने विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. 10 मंत्र्यांच्या नातेवाईकांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला. भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप केला. या अहवालात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. भुजबळ यांचे सुपुत्र समिर भुजबळांना 9.39 कोटींची जागा 9 लाखात देण्यात आली. गोण खनिजांसाठीची राखीव 50 हजार स्क्वेअर मीटर जमीन इंजिनियरिंग कॉलेजला देण्यात आली. तर 2009 मध्ये भुजबळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेचसार्वजनिक बांधकाम खात्याची जमीन आपल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला कवडीमोल भावानं विकल्याचा ठपक भुजबळ यांच्यावर कॅगच्या रिपोर्टमध्ये ठेवण्यात आला.

नाशिकच्या गोवर्धनमधल्या या भूखंडाच्या व्यवहार ?

- पीडब्लूडी (PWD)च्या जमिनीचा एमईटीला ताबा- सात हेक्टर जमिनीचा ताबा- 23 डिसेंबर 2003- 4 हेक्टर 13 आर क्षेत्राचा ताबा- 1 लाख 54 हजार 875 रुपये सरकारी तिजोरीत भरले

17 फेब्रुवारी 2009- 5 हेक्टर क्षेत्राचा ताबा- 7 लाख 53 हजार 250 रुपये सरकारी तिजोरीत भरले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2012 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close