S M L

दुष्काळाबाबत राज्यपालांनी घेतली बैठक

09 एप्रिलराज्यातल्या दुष्काळाबाबत राज्यपाल के शंकरनारायणन गंभीर नाहीत अशी टीका केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केली होती. त्यानंतर राज्यपाल खडबडून जागे झाले. त्यांनी आज राज्यातल्या दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. सुरुवातीला मदत आणि पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्यासह वरीष्ठ अधिकार्‍यांची त्यांनी भेट घेतली. पतंगराव कदमांनी राज्यपालांना दुष्काळग्रस्त 9 जिल्ह्यांमध्ये सरकारकडून केल्या जाणार्‍या उपाययोजनांची माहिती दिली. आणि दुष्काळी भागासाठी विशेष पॅकेजची मागणीही केली. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली. सरकार लवकरच पूर्ण धोरण जाहीर करणार असल्याचं पतंगराव कदम यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 9, 2012 10:35 AM IST

दुष्काळाबाबत राज्यपालांनी घेतली बैठक

09 एप्रिल

राज्यातल्या दुष्काळाबाबत राज्यपाल के शंकरनारायणन गंभीर नाहीत अशी टीका केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केली होती. त्यानंतर राज्यपाल खडबडून जागे झाले. त्यांनी आज राज्यातल्या दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. सुरुवातीला मदत आणि पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्यासह वरीष्ठ अधिकार्‍यांची त्यांनी भेट घेतली. पतंगराव कदमांनी राज्यपालांना दुष्काळग्रस्त 9 जिल्ह्यांमध्ये सरकारकडून केल्या जाणार्‍या उपाययोजनांची माहिती दिली. आणि दुष्काळी भागासाठी विशेष पॅकेजची मागणीही केली. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली. सरकार लवकरच पूर्ण धोरण जाहीर करणार असल्याचं पतंगराव कदम यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2012 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close