S M L

अवैध धंदे रोखण्यासाठी आमदाराची 'गांधीगिरी'

07 एप्रिलअमळनेरमध्ये अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. पोलीस प्रशासनाच्या कारवाईनंतरही धंदे बंद होण्याची लक्षणे नाहीत. अमळनेरचे आमदार साहेबराव पाटील यांनी या मटका चालकांविरुध्द गांधीगिरी मोहीम हाती घेतली आहे. मटका सुरु असलेल्या ठिकाणी आमदार पोहोचतात, मटका चालकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करतात. शहरातील चार मटका केंद्रावर आमदारासाहेबांनी अशीचं गांधीगिरी केली. आमदार साहेबांच्या या गांधीगिरीमुळे मटका चालक पुरते चक्रावून गेलेत. पोलिसांकडे वारंवार तक्रार करुनदेखील कारवाई न झाल्यामुळे गांधीगिरी करावी लागत असल्याचं साहेबराव पाटील यांच म्हणणं आहे. त्यांच्या या गांधीगिरीनंतर तरी पोलीस प्रशासनाला जाग येईल का हा प्रश्नच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2012 03:14 PM IST

अवैध धंदे रोखण्यासाठी आमदाराची 'गांधीगिरी'

07 एप्रिल

अमळनेरमध्ये अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. पोलीस प्रशासनाच्या कारवाईनंतरही धंदे बंद होण्याची लक्षणे नाहीत. अमळनेरचे आमदार साहेबराव पाटील यांनी या मटका चालकांविरुध्द गांधीगिरी मोहीम हाती घेतली आहे. मटका सुरु असलेल्या ठिकाणी आमदार पोहोचतात, मटका चालकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करतात. शहरातील चार मटका केंद्रावर आमदारासाहेबांनी अशीचं गांधीगिरी केली. आमदार साहेबांच्या या गांधीगिरीमुळे मटका चालक पुरते चक्रावून गेलेत. पोलिसांकडे वारंवार तक्रार करुनदेखील कारवाई न झाल्यामुळे गांधीगिरी करावी लागत असल्याचं साहेबराव पाटील यांच म्हणणं आहे. त्यांच्या या गांधीगिरीनंतर तरी पोलीस प्रशासनाला जाग येईल का हा प्रश्नच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2012 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close