S M L

दिल्लीवर बंगलोरचा 'रॉयल'विजय

07 एप्रिलएबी डिव्हिलिअर्सची नॉटआऊट हाफसेंच्युरी आणि मुथय्या मुरलीधरनने घेतलेल्या 3 विकेटच्या जोरावर बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 20 रन्सनं पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या बंगलोरने दिल्लीसमोर विजयासाठी 158 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. याला उत्तर देताना दिल्लीला 7 विकेट गमावत 137 रन्सच करता आले. दिल्ली टीमचा कॅप्टन वीरेंद्र सेहवागने टॉस जिंकून बंगलोरला पहिली बॅटिंग दिली. पण बंगलोरची सुरुवात खराब झाली. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सौरव तिवारी, आणि मयांक अग्रवाल हे प्रमुख बॅट्समन ठराविक अंतराने आऊट झाले. पण एबी डिव्हिलिअर्सने फटकेबाजी करत टीमला दीडशे रन्सचा टप्पा पार करुन दिला. अखेरच्या ओव्हर्समध्ये विनय कुमारने 18 रन्स केले. दिल्ली हे आव्हान पेलवता आलं नाही. ओपनिंगला आलेला वीरेंद्र सेहवाग शुन्यावर आऊट झाला. नमन ओझा आणि इरफान पठाणनं फटकेबाजी केली पण टीमला विजय मिळवून देण्यात मात्र ते अपयशी ठरले. बंगलोरतर्फे स्पीन बॉलर मुथय्या मुरलीधरननं सर्वाधिक 3 विकेट घेत आपल्या स्पीनची जादू अजूनही कायम असल्याचं दाखवून दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2012 05:24 PM IST

दिल्लीवर बंगलोरचा 'रॉयल'विजय

07 एप्रिल

एबी डिव्हिलिअर्सची नॉटआऊट हाफसेंच्युरी आणि मुथय्या मुरलीधरनने घेतलेल्या 3 विकेटच्या जोरावर बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 20 रन्सनं पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या बंगलोरने दिल्लीसमोर विजयासाठी 158 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. याला उत्तर देताना दिल्लीला 7 विकेट गमावत 137 रन्सच करता आले. दिल्ली टीमचा कॅप्टन वीरेंद्र सेहवागने टॉस जिंकून बंगलोरला पहिली बॅटिंग दिली. पण बंगलोरची सुरुवात खराब झाली. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सौरव तिवारी, आणि मयांक अग्रवाल हे प्रमुख बॅट्समन ठराविक अंतराने आऊट झाले. पण एबी डिव्हिलिअर्सने फटकेबाजी करत टीमला दीडशे रन्सचा टप्पा पार करुन दिला. अखेरच्या ओव्हर्समध्ये विनय कुमारने 18 रन्स केले. दिल्ली हे आव्हान पेलवता आलं नाही. ओपनिंगला आलेला वीरेंद्र सेहवाग शुन्यावर आऊट झाला. नमन ओझा आणि इरफान पठाणनं फटकेबाजी केली पण टीमला विजय मिळवून देण्यात मात्र ते अपयशी ठरले. बंगलोरतर्फे स्पीन बॉलर मुथय्या मुरलीधरननं सर्वाधिक 3 विकेट घेत आपल्या स्पीनची जादू अजूनही कायम असल्याचं दाखवून दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2012 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close