S M L

राजावाडी हॉस्पिटलबाहेर मनसे कार्यकर्त्यांचा धिंगाणा

10 एप्रिलराजावाडी हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधा नसल्याने तोडफोडीचा इशारा राम कदम यंानी दिला होता. आज हॉस्पिटलबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदेलनासाठी गर्दी केली होती. हॉस्पिटलमधल्या सोयीसुविधांसाठीच्या या आंदोलनाला मात्र एखाद्या उत्सवाचं स्वरुप आलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर मोठमोठ्याने राम कदम आणि मनसेच्या नावाने घोषणाबाजी केली त्यामुळे रुग्णांना याचा त्रास झाला, एवढंच नाही तर राम कदम हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचं स्वागत केलं. खर तर हॉस्पिटलचा परिसर हा सायलेन्स झोन असतो. पण तिथं फटाके फोडल्याने रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या आंदोलनाने त्यानंच त्रास सहन करावा लागला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2012 09:43 AM IST

राजावाडी हॉस्पिटलबाहेर मनसे कार्यकर्त्यांचा धिंगाणा

10 एप्रिल

राजावाडी हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधा नसल्याने तोडफोडीचा इशारा राम कदम यंानी दिला होता. आज हॉस्पिटलबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदेलनासाठी गर्दी केली होती. हॉस्पिटलमधल्या सोयीसुविधांसाठीच्या या आंदोलनाला मात्र एखाद्या उत्सवाचं स्वरुप आलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर मोठमोठ्याने राम कदम आणि मनसेच्या नावाने घोषणाबाजी केली त्यामुळे रुग्णांना याचा त्रास झाला, एवढंच नाही तर राम कदम हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचं स्वागत केलं. खर तर हॉस्पिटलचा परिसर हा सायलेन्स झोन असतो. पण तिथं फटाके फोडल्याने रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या आंदोलनाने त्यानंच त्रास सहन करावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2012 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close