S M L

नदीत बुडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

10 एप्रिलभिंवडीमधील कामवारी नदीत 5 मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पण आता या पाच जणांच्या मृत्यूचं गूढ उकललंय. या पाचही जणांचा बुडून मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टेमधून स्पष्ट झालं आहे. कांता केणे ही महिला आपल्या दोन मुलं आणि दोन मुलींनी घेऊन कामवारी नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यापैकी तिचा मुलगा मयूर पोहत असताना बुडाला. त्याला वाचवण्यासाठी इतर भाऊ बहिण गेले आणि तेही बुडताना पाहून आई कांता केणे यांनी नदीत त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतली. त्यातच या कुटुंबाचा बुडून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2012 11:06 AM IST

नदीत बुडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

10 एप्रिल

भिंवडीमधील कामवारी नदीत 5 मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पण आता या पाच जणांच्या मृत्यूचं गूढ उकललंय. या पाचही जणांचा बुडून मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टेमधून स्पष्ट झालं आहे. कांता केणे ही महिला आपल्या दोन मुलं आणि दोन मुलींनी घेऊन कामवारी नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यापैकी तिचा मुलगा मयूर पोहत असताना बुडाला. त्याला वाचवण्यासाठी इतर भाऊ बहिण गेले आणि तेही बुडताना पाहून आई कांता केणे यांनी नदीत त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतली. त्यातच या कुटुंबाचा बुडून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2012 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close