S M L

मालेगाव पालिकेची रविवारी निवडणूक

12 एप्रिलराज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता उर्वरीत पालिका निवडणुकीचे मैदान रंगू लागले आहे. 2001 ला स्थापन झालेल्या मालेगाव महापालिकेची तिसरी निवडणूक येत्या रविवारी होत आहे. त्यासाठी विक्रमी संख्येनं पक्ष आणि आघाड्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. 80 जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत 471 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, शिवसेना, मनसे यांच्या सोबत जनराज्य आणि शहर विकास या आघाड्याही आहेत. भुयारी गटार योजना, मोसम नदी सुधार प्रकल्प आणि घरकूल योजना हे प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2012 10:45 AM IST

मालेगाव पालिकेची रविवारी निवडणूक

12 एप्रिल

राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता उर्वरीत पालिका निवडणुकीचे मैदान रंगू लागले आहे. 2001 ला स्थापन झालेल्या मालेगाव महापालिकेची तिसरी निवडणूक येत्या रविवारी होत आहे. त्यासाठी विक्रमी संख्येनं पक्ष आणि आघाड्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. 80 जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत 471 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, शिवसेना, मनसे यांच्या सोबत जनराज्य आणि शहर विकास या आघाड्याही आहेत. भुयारी गटार योजना, मोसम नदी सुधार प्रकल्प आणि घरकूल योजना हे प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2012 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close