S M L

आज दादा-धोणी आमने-सामने

14 एप्रिलआयपीएलमध्ये आज शनिवारी भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि माजी कॅप्टन सौरव गांगुली आमने सामने उभे ठाकतील. चेन्नई सुपर किंग्ज आणि पुणे वॉरियर्स दरम्यान रंगणारी ही मॅच दोन्ही टीमसाठी पॉईंटटेबलच्या दृष्टीनंही महत्वाची ठरणार आहे. पुणे टीम सध्या तिसर्‍या तर चेन्नई पाचव्या क्रमांकावर आहे. पुणे टीमने स्पर्धेत सलग दोन विजय मिळवत सुरुवात चांगली केली. पण तिसर्‍या मॅचमध्ये त्यांना किंग्ज इलेव्हनने पराभवाचा धक्का दिला. याऊलट चेन्नईची टीम पराभवातून सावरत पुन्हा विजयाच्या मार्गावर परतली आहे. चेन्नईने 200 रन्सचे टार्गेट पार करत बंगलोरचा पराभव केला होता. चेन्नईचे बॅट्समन जबरदस्त फॉर्मात आहेत, पण मॅच पुणे टीमच्या होम ग्राऊंडवर होणार असल्यानं चेन्नईसाठी ही मॅच सोपी नसणार हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2012 12:23 PM IST

आज दादा-धोणी आमने-सामने

14 एप्रिल

आयपीएलमध्ये आज शनिवारी भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि माजी कॅप्टन सौरव गांगुली आमने सामने उभे ठाकतील. चेन्नई सुपर किंग्ज आणि पुणे वॉरियर्स दरम्यान रंगणारी ही मॅच दोन्ही टीमसाठी पॉईंटटेबलच्या दृष्टीनंही महत्वाची ठरणार आहे. पुणे टीम सध्या तिसर्‍या तर चेन्नई पाचव्या क्रमांकावर आहे. पुणे टीमने स्पर्धेत सलग दोन विजय मिळवत सुरुवात चांगली केली. पण तिसर्‍या मॅचमध्ये त्यांना किंग्ज इलेव्हनने पराभवाचा धक्का दिला. याऊलट चेन्नईची टीम पराभवातून सावरत पुन्हा विजयाच्या मार्गावर परतली आहे. चेन्नईने 200 रन्सचे टार्गेट पार करत बंगलोरचा पराभव केला होता. चेन्नईचे बॅट्समन जबरदस्त फॉर्मात आहेत, पण मॅच पुणे टीमच्या होम ग्राऊंडवर होणार असल्यानं चेन्नईसाठी ही मॅच सोपी नसणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2012 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close