S M L

आयबीएन लोकमत इम्पॅक्ट : स्मशानभूमीबाबत पालिकेनं घेतली दखल

13 एप्रिलनालासोपार्‍यातील निळेमोरे गावातल्या नागरिकांचा स्मशानभूमीची समस्या आयबीएन लोकमतवर दाखवली होती. निळेमोरे गावासाठी आरक्षित स्मशान भूमीच्या जागेत महापालिकेनं गोडाऊन बनवलं होतं. या बातमीची वसई विरार महानगरपालिकेचे महापौर राजीव पाटील यांनी दखल घेतलीय. रेल्वेनं जागा न दिल्यास दुसर्‍या ठिकाणी स्मशान भूमी करणार असल्याचं आश्वासन दिलं. स्मशान भूमीबाबत रेल्वेशी पत्रव्यवहार सुरु असल्याचही त्यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या नालासोपारामध्ये स्मशानभूमीत पालिकेनंच अतिक्रमण केलंय. त्यामुळे रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. नालासोपार्‍याच्या पश्चिमेकडे निळेमोरे गाव आहे. या गावासाठी असलेल्या स्मशानभूमीवर पालिकेनं भंगारासाठी गोडाऊन बनवलंय. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लोकांना जागाच राहिलेली नाही. रेल्वेच्या जमिनीवर लोकांनी तात्पुरती सोय केली. पण रेल्वेचा त्याला विरोध आहे. त्यामुळे मृत्युनंतर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा गंभीर प्रश्न गावकर्‍यांना पडला. गावकर्‍यांनी पर्यायी जागेचा प्रस्ताव दिला. त्यालाही अजून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे गावकर्‍यांनी आता उपोषणाचा इशारा दिला होता. आता महापौर राजीव पाटील यांनी रेल्वेनं जागा न दिल्यास दुसर्‍या ठिकाणी स्मशान भूमी करणार असल्याचं आश्वासन दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2012 09:09 AM IST

13 एप्रिल

नालासोपार्‍यातील निळेमोरे गावातल्या नागरिकांचा स्मशानभूमीची समस्या आयबीएन लोकमतवर दाखवली होती. निळेमोरे गावासाठी आरक्षित स्मशान भूमीच्या जागेत महापालिकेनं गोडाऊन बनवलं होतं. या बातमीची वसई विरार महानगरपालिकेचे महापौर राजीव पाटील यांनी दखल घेतलीय. रेल्वेनं जागा न दिल्यास दुसर्‍या ठिकाणी स्मशान भूमी करणार असल्याचं आश्वासन दिलं. स्मशान भूमीबाबत रेल्वेशी पत्रव्यवहार सुरु असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

ठाणे जिल्ह्यातल्या नालासोपारामध्ये स्मशानभूमीत पालिकेनंच अतिक्रमण केलंय. त्यामुळे रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. नालासोपार्‍याच्या पश्चिमेकडे निळेमोरे गाव आहे. या गावासाठी असलेल्या स्मशानभूमीवर पालिकेनं भंगारासाठी गोडाऊन बनवलंय. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लोकांना जागाच राहिलेली नाही. रेल्वेच्या जमिनीवर लोकांनी तात्पुरती सोय केली. पण रेल्वेचा त्याला विरोध आहे. त्यामुळे मृत्युनंतर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा गंभीर प्रश्न गावकर्‍यांना पडला. गावकर्‍यांनी पर्यायी जागेचा प्रस्ताव दिला. त्यालाही अजून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे गावकर्‍यांनी आता उपोषणाचा इशारा दिला होता. आता महापौर राजीव पाटील यांनी रेल्वेनं जागा न दिल्यास दुसर्‍या ठिकाणी स्मशान भूमी करणार असल्याचं आश्वासन दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2012 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close