S M L

पुण्याची 'दादा'गिरी, विजय ओढला भारी

14 एप्रिलपुणे वॉरियर्सने पुन्हा एकदा आपल्या होमगाऊंडवर चेन्नईला हरवत विजयाचा झेंडा रोवला आहे. आज माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोणी यांच्यात आज थेट सामाना झाला. पण दादाच्या टीमने 7 विकेट राखून चेन्नईचा पराभव केला. याविजयाचा खरा सुत्रधार ठरला तो जे सी रायडर. शेवटच्या बॉलपर्यंत रायडरने विजय खेचून आणला. टॉस जिंकून चेन्नईनं पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि 20 ओव्हरमध्ये चेन्नईनं पुण्यासमोर विजयासाठी 156 रन्सचं टार्गेट ठेवलं. चेन्नईची सुरुवात आज चांगली झाली. ड्यु प्लेसिसने फटकेबाजी करत टीमला चांगली सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर मुरली विजय 8 रन्सवर आऊट झाला. प्लेसिसनं 33 बॉल्समध्ये 5 फोर आणि 2 सिक्स ठोकत 43 रन्स केले. तर त्याला साथ दिली ती सुरेश रैनानं. त्यानं 19 बॉल्समध्ये 2 फोर मारत 20 रन्स केले. पण त्यानंतर आलेल्या धोणी आणि रवींद्र जडेजानं चेन्नईचा स्कोअर वाढवला. धोणीनं 28 बॉल्समध्ये 1 फोर मारत 26 रन्स केले. तर जडेजानं फटकेबाजी करत टीमला 150 चा टप्पा पार करुन दिला. जडेजानं 26 बॉल्समध्ये 4 फोर आणि 2 सिक्स मारत 44 रन्स केले. पण त्यानंतर बॅटिंगला आलेल्या पुण्याची सुरुवातही चांगली केली. पण उथप्पा 10 र्नसवर रन आऊट झाला. पण जेसी रायडरनं कॅप्टन गांगुलीबरोबर फटकेबाजी करत स्कोर बोर्ड हलता ठेवला. पण त्यानंतर गांगुलीही रन आऊट झाला, त्यानं 16 रन्स केले. पण रायडरने संयमी खेळी करत विजय खेचून आणला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2012 06:10 PM IST

पुण्याची 'दादा'गिरी, विजय ओढला भारी

14 एप्रिल

पुणे वॉरियर्सने पुन्हा एकदा आपल्या होमगाऊंडवर चेन्नईला हरवत विजयाचा झेंडा रोवला आहे. आज माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोणी यांच्यात आज थेट सामाना झाला. पण दादाच्या टीमने 7 विकेट राखून चेन्नईचा पराभव केला. याविजयाचा खरा सुत्रधार ठरला तो जे सी रायडर. शेवटच्या बॉलपर्यंत रायडरने विजय खेचून आणला. टॉस जिंकून चेन्नईनं पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि 20 ओव्हरमध्ये चेन्नईनं पुण्यासमोर विजयासाठी 156 रन्सचं टार्गेट ठेवलं.

चेन्नईची सुरुवात आज चांगली झाली. ड्यु प्लेसिसने फटकेबाजी करत टीमला चांगली सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर मुरली विजय 8 रन्सवर आऊट झाला. प्लेसिसनं 33 बॉल्समध्ये 5 फोर आणि 2 सिक्स ठोकत 43 रन्स केले. तर त्याला साथ दिली ती सुरेश रैनानं. त्यानं 19 बॉल्समध्ये 2 फोर मारत 20 रन्स केले. पण त्यानंतर आलेल्या धोणी आणि रवींद्र जडेजानं चेन्नईचा स्कोअर वाढवला. धोणीनं 28 बॉल्समध्ये 1 फोर मारत 26 रन्स केले. तर जडेजानं फटकेबाजी करत टीमला 150 चा टप्पा पार करुन दिला. जडेजानं 26 बॉल्समध्ये 4 फोर आणि 2 सिक्स मारत 44 रन्स केले. पण त्यानंतर बॅटिंगला आलेल्या पुण्याची सुरुवातही चांगली केली. पण उथप्पा 10 र्नसवर रन आऊट झाला. पण जेसी रायडरनं कॅप्टन गांगुलीबरोबर फटकेबाजी करत स्कोर बोर्ड हलता ठेवला. पण त्यानंतर गांगुलीही रन आऊट झाला, त्यानं 16 रन्स केले. पण रायडरने संयमी खेळी करत विजय खेचून आणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2012 06:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close