S M L

रिक्षाचालकांचा बेमुदत संप मागे, उद्या एकदिवसीय संप

15 एप्रिलरिक्षाचालकांच्या बेमुदत संपाच्या इशार्‍याने धास्तावलेल्या राज्यभरातल्या सगळ्या प्रवाशांना थोडा तरी दिलासा मिळाला. रिक्षा युनियनचे नेते शरद राव यांनी बेमुदत संपाचा इशारा मागे घेतला. मात्र उद्या सर्व रिक्षांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप असेल. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सगळ्यांचे हाल होणार आहेत. दरम्यान, या संपाला शिवसेना आणि मनसेचा मात्र विरोध आहे. दरवाढ करण्याच्या मुद्यावरून रिक्षाचालकांच्या संघटनांनी दिलेला बेमुदत संपाचा इशारा मागे घेतला. पण रिक्षाचालक संघटना सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यावर मात्र ठाम आहेत. रिक्षा चालक संघटनांबाबत कळवळा व्यक्त करणार्‍या शरद रावांचा या बंदमागे वेगळाच स्वार्थ आहे, असा थेट आरोप मनसेनं केला.मनसे प्रमाणेच शिवसेनेनंही या बंदला विरोध केला. बेमुदत संपाचा मागे घेतलेला इशारा... शिवसेना आणि मनसे या संघटनांनी केलेला विरोध. यामुळे प्रवाशांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला असला तरी लाक्षणिक संपामुळे रिक्षाची एक दिवसाची शिक्षा प्रवाशांना सहन करावीच लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2012 01:54 PM IST

रिक्षाचालकांचा बेमुदत संप मागे, उद्या एकदिवसीय संप

15 एप्रिल

रिक्षाचालकांच्या बेमुदत संपाच्या इशार्‍याने धास्तावलेल्या राज्यभरातल्या सगळ्या प्रवाशांना थोडा तरी दिलासा मिळाला. रिक्षा युनियनचे नेते शरद राव यांनी बेमुदत संपाचा इशारा मागे घेतला. मात्र उद्या सर्व रिक्षांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप असेल. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सगळ्यांचे हाल होणार आहेत. दरम्यान, या संपाला शिवसेना आणि मनसेचा मात्र विरोध आहे.

दरवाढ करण्याच्या मुद्यावरून रिक्षाचालकांच्या संघटनांनी दिलेला बेमुदत संपाचा इशारा मागे घेतला. पण रिक्षाचालक संघटना सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यावर मात्र ठाम आहेत.

रिक्षा चालक संघटनांबाबत कळवळा व्यक्त करणार्‍या शरद रावांचा या बंदमागे वेगळाच स्वार्थ आहे, असा थेट आरोप मनसेनं केला.मनसे प्रमाणेच शिवसेनेनंही या बंदला विरोध केला. बेमुदत संपाचा मागे घेतलेला इशारा... शिवसेना आणि मनसे या संघटनांनी केलेला विरोध. यामुळे प्रवाशांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला असला तरी लाक्षणिक संपामुळे रिक्षाची एक दिवसाची शिक्षा प्रवाशांना सहन करावीच लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2012 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close